For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दर्शनाच्या रांगेवरून वाद; BJP आमदाराच्या मुलीने महिला PSIच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ व्हायरल

02:55 PM Aug 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
दर्शनाच्या रांगेवरून वाद  bjp आमदाराच्या मुलीने महिला psiच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ व्हायरल
Advertisement

श्रीरंगपट्टण : कर्नाटकातील श्रीरंगपट्टण येथील आरती उक्काता मंदिरात भाजपा आमदाराच्या मुलीने महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, मंदिरातील गर्दी आणि गाभाऱ्यात प्रवेशावरून हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, तुमाकुरु ग्रामीणचे भाजपा आमदार बी. सुरेश गौडा यांची मुलगी ऐश्वर्या मंदिरात दर्शनासाठी आली होती. त्यावेळी मंदिरात मोठी गर्दी असल्याने भाविकांच्या रांगेचे नियमन करण्यासाठी महिला PSI सविता बी. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती.

ऐश्वर्या इतर काही लोकांसह मंदिरात आली असता तिने रांगेत न थांबता गाभाऱ्यात जाण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. यावेळी सविता पाटील यांनी गर्दीचा विचार करून काही वेळ थांबण्याची विनंती केली. त्यावरून दोघींमध्ये वाद सुरू झाला.

Advertisement

“मी आमदाराची मुलगी आहे” म्हणत वाद?
वादादरम्यान ऐश्वर्या मोबाईलवर बोलताना तसेच कोणाला तरी फोन करण्याचा प्रयत्न करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. त्यानंतर तिने सविता पाटील यांच्या कानशिलात लगावल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यानंतर सविता पाटील यांनीही प्रत्युत्तर दिल्याचे फुटेजमध्ये दिसते.

घटना वाढत असल्याचे पाहून मंदिरातील उपस्थितांनी दोघींमध्ये मध्यस्थी करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला.

घटनेचा व्हिडीओ व्हायरल
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. आमदाराच्या मुलीने पोलीस अधिकाऱ्याशी केलेल्या कथित गैरवर्तनावरूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, या प्रकरणात दोन्ही बाजूंचे म्हणणे आणि पोलिसांकडून झालेली अधिकृत कारवाई महत्त्वाची ठरणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, ऐश्वर्या आणि PSI सविता पाटील यांच्यातील वाद नेमका कशामुळे वाढला, याबाबत अधिक तपास केला जात आहे.

Advertisement
Tags :

.