For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लाच स्वीकारताना भाजप आमदार चंद्रु लमाणी लोकायुक्त जाळ्यात

06:06 AM Feb 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
लाच स्वीकारताना भाजप आमदार  चंद्रु लमाणी लोकायुक्त जाळ्यात
Advertisement

दोन स्वीय साहाय्यकांसह ताब्यात : 5 लाख रु. जप्त

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्याच्या इतिहासात प्रथमच एका आमदाराला 5 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. क्लास वन कंत्राटदाराकडून लाच स्वीकारत असताना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी भाजपचे गदग जिल्ह्यातील शिरहट्टीचे आमदार डॉ. चंद्रु लमाणी यांना त्यांच्या दोन स्वीय साहाय्यकांसमवेत ताब्यात घेतले.

Advertisement

रस्त्याकडेला कम्पाउंड निर्माण केल्यानंतर त्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी आमदार चंद्रू लमाणी यांनी लघुपाटबंधारे खात्यातील क्लास वन कंत्राटदार विजय पुजार यांच्याकडे 11 लाखांची कमिशनची मागणी केली होती. या प्रकरणी विजय यांनी लोकायुक्त पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

शनिवारी दुपारी 2:15 च्या सुमारास लोकायुक्त पोलिसांनी गदग जिल्ह्याच्या लक्ष्मेश्वर तालुक्यातील चंद्रु लमाणी यांच्या मालकीच्या बालाजी हॉस्पिटलमध्ये 5 लाख रु. आगाऊ स्वीकारत असताना चंद्रु लमाणी, त्यांची स्वीय साहाय्यक मंजुनाथ वाल्मिकी आणि गुरु नायक यांना रंगेहाथ पकडले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे.

कारवाईवेळी आमदार लमाणी यांचे स्वीय साहाय्यक गुरु नायक याने 50 हजारांची रोकड असणारे कव्हर हॉस्पिटलच्या मागील बाजूला असलेल्या खासगी शाळेच्या कम्पाउंडमध्ये फेकून दिले. सदर रक्कम आणि हॉस्पिटलमध्ये लाच स्वीकारलेले 4.50 लाख रुपये जप्त करण्यात आले. लोकायुक्त अधीक्षक सिद्धलिंगप्पा यांच्या नेतृत्वाखाली गदग लोकायुक्त डीवायएसपी विजय बिरादार, पोलीस निरीक्षक परमेश कवटगी व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

Advertisement
Tags :

.