For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘युतीधर्म कायम ठेवणार; फोंड्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय’ : भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक

10:28 AM Sep 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘युतीधर्म कायम ठेवणार  फोंड्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय’   भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक
Advertisement

पणजी : आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-मगो युती कायम ठेवण्याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिले आहेत. विद्यमान राजकीय परिस्थितीत ही युती गरजेची असून, आगामी निवडणुकीतही दोन्ही पक्षांमधील समन्वय कायम राहील, असे नाईक यांनी स्पष्ट केले. भाजपने 30 मतदारसंघ जिंकण्याचे लक्ष्य ठेवले असून, ते साध्य करण्यासाठी पक्ष संघटनात्मक पातळीवर तयारी करत आहे.

Advertisement

फोंडा येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना नाईक म्हणाले की, कोणताही पक्ष केवळ भावनेवर चालत नाही. बदलती राजकीय परिस्थिती, जिंकण्याची क्षमता, संयम आणि सतर्कतेने घेतलेले निर्णय यावर पक्षाची रणनीती ठरते. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत भाजप-मगो युती महत्त्वाची आहे.

फोंडा मतदारसंघासह राज्यातील जागावाटपाबाबत भाजपचे केंद्रीय नेतृत्व, राज्यातील वरिष्ठ नेते आणि घटक पक्षांचे प्रमुख यांच्यात चर्चा होऊन योग्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. युतीधर्म पाळताना सर्व प्रश्न समन्वय आणि सामंजस्याने सोडवले जातील, असे नाईक यांनी स्पष्ट केले.

Advertisement

‘भाजपची संघटना शिस्तबद्ध’

भाजप ही शिस्तबद्ध संघटना असून कार्यकर्त्यांची एकजूट आणि तळागाळातील कामकाज सातत्याने सुरू आहे. त्यामुळे पक्षाला राज्यात यश मिळत असल्याचे नाईक यांनी सांगितले. विरोधकांकडून विविध प्रकारच्या चर्चा आणि गैरसमज पसरवले जात असले, तरी मतदारांचा विश्वास हेच भाजपचे सामर्थ्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने 30 जागा जिंकण्याचे लक्ष्य यापूर्वीही जाहीर केले आहे.

Advertisement
Tags :

.