For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गटबाजीवर तोडग्यासाठी भाजपश्रेष्ठींची कसरत

06:16 AM Jan 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
गटबाजीवर तोडग्यासाठी भाजपश्रेष्ठींची कसरत
Advertisement

राधामोहनदास यांच्या उपस्थितीत राज्य भाजप कार्यकारिणीची बैठक

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्य भाजपमधील गटबाजीवर तोडगा काढण्यासाठी तसेच नवीन प्रदेशाध्यक्ष निवडीसंबंधी मते जमा करण्यासाठ भाजप हायकमांडची कसरत सुरु झाली आहे. मंगळवारी राज्य भाजप प्रभारी राधामोहनदास अगरवाल व इतर नेत्यांच्या उपस्थितीत हायव्होल्टेज बैठका झाल्या. राधामोहनदास यांनी राज्य भाजपमधील नेत्यांची मते जाणून घेतली आहेत. लवकरच ते हा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे सादर करतील.

Advertisement

राज्य भाजप प्रभारी राधामोहनदास अगरवाल, सहप्रभारी सुधाकर रेड्डी , पक्ष संघटना पर्वचे राज्य निरीक्षक पोन्नू राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप कार्यकारिणी बैठक मंगळवारी बेंगळुरात पार पडली. बैठकीत राज्य भाजपमधील गटबाजी दूर करण्यासाठी सर्व आमदार, खासदार, विधानपरिषद सदस्यांची मते जाणून घेण्यात आली. तसेच नवीन प्रदेशाध्यक्ष निवडीविषयी मतेही मगविण्यात आली.

निवडणुकीद्वारे नवीन प्रदेशाध्यक्ष निवडावा की हायकमांडने योग्य व्यक्तीची नियुक्ती करावी, यावरही सर्व विचारमंथन करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून काहीजण पक्षांतर्गत मुद्द्यांवर उघडपणे वाच्यता करत आहेत. यामुळे पक्षाच्या प्रमितेला धक्का बसला आहे. कार्यकर्त्यांनाही दु:ख आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी पक्षाच्या 50 आमदारांनी आपपली मते मांडली. उघडपणे भाष्य करणाऱ्या नेत्यांना राष्ट्रीय नेत्यांनी ताकीद द्यावी, अशी विनंती आमदारांनी केली. त्यावर वरिष्ठ नेत्यांनी पक्षसंघटनेसोबत उभे राहून पक्ष बळकट करण्यासाठी सर्वांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन वरिष्ठांनी दिले. ‘संघटना पर्व’च्या निमित्ताने सदस्यत्व अभियान, मंडल अध्यक्ष, जिल्हा अध्यक्षांच्या नेमणुकीसाठी सुरू असलेल्या कामांची माहितीही राज्य नेत्यांनी वरिष्ठांना दिली. 2028 मध्ये राज्यात भाजपला सत्तेवर आणण्यासाठी संघटीतपणे काम करण्याची आवश्यकता असल्याचा कानमंत्र राधामोहनदास यांनी नेत्यांना दिल्याची माहिती राज्य भाजपचे मुख्य सचिव प्रीतम गौडा बैठकीनंतर पत्रकारांना दिली.

निवडणुकीसाठी संघटनात्मक प्रक्रियेवर चर्चा

कार्यकारिणी बैठकीपूर्वी राधामोहनदास अगरवाल यांनी सर्व जिल्हा भाजप अध्यक्षपदांच्या निवडणुका आणि प्रदेशाध्यक्ष निवडणुकीसाठी संघटनात्मक प्रक्रियेवर चर्चा केली. या बैठकीला पक्षातील निवडणूक अधिकारी, साहाय्यक निवडणूक अधिकारी आणि 13 पर्यवेक्षक उपस्थित होते. पक्षाच्या कामाजासह आणि नवीन प्रदेशाध्यक्षांच्या निवडीसह सर्व गोष्टींवर यावेळी चर्चा झाली. प्रदेशाध्यक्ष निवडणुकीसंदर्भात प्रभारी केंद्रीयमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत 2-3 दिवसांत अंतिम बैठक आयोजित केली जाईल. त्यात प्रदेशाध्यक्ष निवडणूक कोणत्या स्वरूपाची असावी, यावर निर्णय घेतला जाईल.

बैठकीला निमंत्रण नसल्याचे माजी आमदार नाराज

राधामोहनदास यांनी पक्षाचे आमदार, विधानपरिषद सदस्य आणि खासदारांचीही बैठक घेतली. मात्र, माजी आमदारांना बैठकीचे निमंत्रण नसल्याने अनेकांनी बैठकीविषयी नाराजी व्यक्त केली. इतकेच नव्हे; तर त्यांनी माजी मंत्री कट्टा सुब्रह्मण्य नायडू यांच्या निवासस्थानी बैठकही घेतली. यानंतर प्रतिक्रिया देताना माजी मंत्री बी. सी. पाटील म्हणाले, केवळ 65 आमदारांकडून सरकार स्थापन करणे, पक्षबांधणी करणे शक्य नाही, असे सांगितले. माजी मंत्री रेणुकाचार्य यांनी देखील राधामोहनदास यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. बैठक घेऊन केवळ आमदार, खासदारांची मते जमा करून चालणार नाही. आमचीही मते जाणून घ्यावीत, अशी मागणी केली. याची दखल घेत राधामोहनदास अगरवाल यांनी रात्री माजी मंत्री एम. पी. रेणुकाचार्य यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदारांची बैठक घेत त्यांचे विचार जाणून घेतले.

विजयेंद्र यांच्यासाठी येडिसमर्थकांचा वरिष्ठांकडे पाठपुरावा

भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनाच या पदावर कायम ठेवावे, अशी विनंती माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या निकटवर्तीयांनी वरिष्ठांना केली आहे. बेंगळूरच्या सदाशिवनगर येथे माजी मंत्री कट्टा सुब्रह्मण्य नायडू यांच्या निवासस्थानी येडियुराप्पा व विजयेंद्र यांच्या समर्थक गटातील माजी मंत्री, माजी आमदारांनी बैठक घेतली. बैठकीत रेणुकाचार्य, कट्टा सुब्रह्मण्य नायडू, बसवराज दडेसगूर, बसवराज नायक, हरताळू हालप्पा, जीवराज, बी. सी. पाटील, अरुणकुमार, रुपाली नायक, हर्षवर्धन, वाय. संपंगी आदी सहभागी झाले होते. त्यांनी विजयेंद्र यांनाच भाजप प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवण्याची मागणी केली आहे.

Advertisement
Tags :

.