महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

छत्तीसगडमध्ये नक्षलींकडून भाजप नेत्याची हत्या

06:31 AM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ रायपूर

Advertisement

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तरमध्ये नक्षलवाद्यांनी आणखी एका भाजप नेत्याची हत्या केली आहे. नारायणपूर जिह्यातील दंडवन गावात नक्षलवाद्यांनी हिंसाचार घडवला. मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी भाजप नेते आणि दांडवन गावचे उपसरपंच पंचमदास माणिकपुरी यांची निर्घृण हत्या केली. हे कृत्य केल्यानंतर नक्षलींनी घटनास्थळी फेकलेली काही पत्रके सापडली आहेत. या पत्रकात नक्षलवाद्यांनी भाजप नेते पंचमदास यांच्या हत्येमागे भ्रष्टाचार आणि पोलिसांसाठी गुप्तचर म्हणून काम करणे हे कारण दिले आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा घबराटीचे वातावरण आहे.

Advertisement

नक्षलवाद्यांच्या बस्तर विभाग समितीने या हत्येची जबाबदारी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अवघ्या 2 दिवस आधी भाजप नेत्याच्या हत्येमुळे दहशतीचे वातावरण आहे. गेल्या 2 वर्षात नारायणपूर जिह्यात नक्षलवाद्यांनी आतापर्यंत 4 भाजप नेत्यांची हत्या केली आहे. एकीकडे नक्षलवाद्यांनी भाजप नेत्याची हत्या करतानाच दुसरीकडे जिह्यात ठिकठिकाणी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे पोस्टर लावण्यात आले आहेत. याशिवाय खाणीत काम करणाऱ्या ट्रकचालकांना आणि वाहतूक संघटनेच्या लोकांनाही जीवे मारण्याच्या धमक्मया देण्यात आल्या आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article