For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माझ्या अटकेसाठी भाजप प्रयत्नशील; अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल

07:00 AM Jan 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
माझ्या अटकेसाठी भाजप प्रयत्नशील  अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल
Advertisement

‘समाचार’...

Advertisement

मद्य घोटाळा प्रकरणात भ्रष्टाचार झाला असता तर एवढे कोट्यावधी ऊपये गेले कुठे?  भाजपचा उद्देश तपास करणे नसून आम आदमी पक्षाला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून रोखणे हा आहे.

- अरविंद केजरीवाल, आप नेते

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुऊवारी पुन्हा एकदा मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीचे (अंमलबजावणी संचालनालय) समन्स बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. भाजपचा उद्देश तपास करणे नसून आम आदमी पक्षाला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून रोखणे हाच असल्याचा हल्लाबोल केजरीवाल यांनी केला आहे. त्यांनी 4 मिनिटे 10 सेकंदाच्या व्हिडिओद्वारे आपले मत व्यक्त केले. कोणतेही ठोस पुरावे नसताना कोणाला तरी पकडून तुऊंगात टाकण्याचे सत्र सुरू आहे. आता भाजपला मला अटक करायची आहे, असेही ते पुढे म्हणाले. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाच्या मुद्द्यावरून दोन दिवसांपासून दिल्लीत सुरू असलेल्या राजकीय गदारोळात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुऊवारी पत्रकार परिषद घेतली. अंमलबजावणी संचालनालयाच्या समन्सवर स्पष्टीकरण देताना मद्य घोटाळ्यात कोणताही भ्रष्टाचार झाला नाही. ईडीला अद्याप कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. आतापर्यंत अंमलबजावणी संचालनालयाला एकही पुरावा सादर करता आलेला नाही, असे ते म्हणाले. मद्य घोटाळ्याची गेल्या दोन वर्षांत अनेकदा चर्चा झाली. गेल्या दोन वर्षांत भाजपच्या सर्व यंत्रणांनी अनेक छापे टाकले. आम आदमी पक्षाच्या अनेकांना अटक करण्यात आली आहे. घोटाळ्यात एक पैसाही भ्रष्टाचार झाला नाही. जर खरोखरच भ्रष्टाचार झाला असेल तर इतके कोटी ऊपये कुठे गेले? भ्रष्टाचार झाला हे सत्य असते तर पैसेही मिळाले असते. त्यांनी आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांना खोट्या प्रकरणात अटक करून तुऊंगात टाकले आहे, असे केजरीवाल म्हणाले.

‘प्रामाणिकपणा ही माझी सर्वात मोठी संपत्ती’

भाजपला मला अटक करायची आहे. माझी सर्वात मोठी संपत्ती आणि शक्ती ही माझा प्रामाणिकपणा ही आहे. खोटे आरोप करून आणि समन्स पाठवून त्यांना माझी बदनामी करायची आहे. माझ्या प्रामाणिकपणावर हल्ला करायचा आहे. त्यांनी मला समन्स पाठवले आहेत. मात्र, माझ्या वकिलांनी हे समन्स बेकायदेशीर असल्याचे सांगितल्यामुळे आपण कायदेशीर उत्तर पाठविल्याचेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

ईडीच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित

दिल्ली मद्य धोरण प्रकरणात ईडीने केजरीवाल यांना तिसऱ्यांदा समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, केजरीवाल अद्याप चौकशीसाठी गेलेले नाहीत. त्यांनी ईडीच्या समन्सला उत्तर देताना आपण राज्यसभा निवडणूक आणि प्रजासत्ताक दिनाच्या तयारीत व्यस्त असल्याचे सांगितले. तसेच आपल्याला जे काही विचारायचे आहे ते लिखित स्वरूपात पाठवा, असेही त्यांनी सांगितले. आपल्या पत्रात त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत, मात्र त्यांची उत्तरे त्यांनी अद्याप दिलेली नाहीत. याचा अर्थ, त्यांच्याकडे माझ्या प्रश्नांची उत्तरे नाहीत, अशी भूमिकाही केजरीवाल यांनी मांडली.

Advertisement
Tags :

.