महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केवळ धनशक्तीमुळेच आचरेत भाजपला सत्ता !

11:49 AM Nov 07, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला साथ देणाऱ्या मतदारांचे आभार ; हरी खोबरेकर

Advertisement

मालवण । प्रतिनिधी

Advertisement

आचरा ग्रामपंचायत निवडणूक शिवसेना पक्षाने पहिल्यांदाच स्वबळावर लढविली आहे. या निवडणुकीत यश मिळाले नसले तरी थोड्या फरकाने शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले आहेत. भाजपने भरमसाठ पैसा वापरून, आणि खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळविली असली तरी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आचरा गावच्या विकासासाठी शिवसेना यापुढेही सर्वोतोपरी सहकार्य करणार आहे.भाजपच्या उमेदवारांनी आचरा गावातील काही प्रश्नांवरून मतदारांना भावनिक करण्याचा देखील प्रयत्न केला. मागील निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार ९०० पेक्षा जास्त मतांनी पराभूत झाले होते. मात्र ,यावेळी भाजपचे मताधिक्य घटले असून २४२ मतांनी त्यांचा विजय झाला आहे. येणाऱ्या काळात आचरा वासियांचा विश्वास संपादन करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून यापेक्षाही चांगले काम करू आणि आचरा वासियांच्या आणि कार्यकर्त्यांच्या कायम पाठीशी राहू असे शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :
# aachra # malvan # bjp # shivsena # tarun bharat news#
Next Article