For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेसच्या विजयाची भाजपला धास्ती

11:54 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेसच्या विजयाची भाजपला धास्ती
Advertisement

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची टीका

Advertisement

पणजी : गोव्यातील काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी आणि दोन्ही जागा जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. दक्षिणेत काँग्रेस विजयी होणार असून, उत्तर गोव्यात 50:50 जिंकण्याचा अंदाज गुप्तचर अहवालात स्पष्ट झाल्याने भाजप आणि त्यांचे नेते बिथरले आहेत. भाजपला आत्तापासूनच धास्ती वाटू लागली आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले. पणजी येथील काँग्रेस भवनात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पाटकर बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता आणि हळदोणचे आमदार कार्लोस फरेरा उपस्थित होते. कॉंग्रेस नेते महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, गोमंतकीय पुरूषोत्तम काकोडक। इतरांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात तसेच गोवा मुक्ती चळवळीतील बलिदान आणि योगदान दिले. म्हणून डॉ. प्रमोद सावंत हे स्वतंत्र भारत आणि मुक्त गोव्यात जन्माला आले, असे सांगून अमित पाटकर यांनी भूतकाळातील काँग्रेस सरकारांनी साधलेल्या विविध विकासप्रकल्पांची यादी वाचून दाखवली.

लोकशाहीच्या हत्येविऊद्ध काँग्रेस लढतेय

Advertisement

2015 मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर पक्षांतराला प्रोत्साहन देऊन भाजपने केलेल्या लोकशाहीच्या हत्येविऊद्ध कॉंग्रेस लढत आहे. भारत जोडो यात्रा ही भारतातील प्रेम आणि एकता पसरवण्यासाठी होती आणि भारत जोडो न्याय यात्रा ही युवक, महिला, शेतकरी, उपेक्षित क्षेत्र आणि ओबीसी, एससी आणि एसटी यांना सक्षम करण्यासाठी आहे, असे अमित पाटकर म्हणाले.

अन्यथा न्यायालयात दाद मागू : कार्लोस फरेरा

एकदा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर, भाजप सरकार विकसित भारत मोहिमेसारखे कोणतेही प्रचारात्मक कार्यक्रम आयोजित करू शकत नाही. भाजपचे स्कार्फ व टोप्या यांचा वापर सरकारी कार्यक्रमात होऊ शकत नाही. निवडणूक आयोगाने यावर त्वरित बंदी न घातल्यास आम्ही न्यायालयात दाद मागू असा इशारा कार्लोस फरेरा यांनी दिला.

प्रत्येक गोमंतकीयावर अडीच लाख कर्ज : युरी

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 5 वर्षे मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाबद्दल जो कार्यक्रम घेतला तो अगदी अपयशी आहे. कारण गेल्या पाच वर्षांत सावंत यांच्या कार्यकाळात राज्यातील सुमारे 36 हजार करोडो ऊपयांचे कर्ज झालेले आहे. हे कर्ज राज्यावर म्हणजे प्रत्येक गोमंतकीयांवर अडीच लाख ऊपये कर्ज झालेले आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.

सदानंद तानावडे यांचे प्रतिआव्हान

काँग्रेसने माझ्याविऊद्ध कोणत्याही ठिकाणी रितसर तक्रार दाखल केली तरी त्याला आपण पुराव्यासह प्रतिउत्तर देऊ. कारण काँग्रेसने महिला नारीशक्तीचा अपमान केला आहे. याला जनताच उत्तर देणार असून, लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला आपली जागा कळून येईल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केला आहे. तानावडे यांनी सांगितले की, काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन आपल्य]िवऊद्ध पोलीस व जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु आपण सर्वतयारीनिशी पुरावे सादर करू. देशात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार असला तरी नारीशक्तीचा अपमान करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी समस्त हिंदूंचा अपमान केला आहे, असा पुनऊच्चारही त्यांनी केला. जून महिन्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती येणार असून, त्यावेळेस पुन्हा एकदा भाजपचे कमळ देशात पुन्हा एकदा फुललेलं दिसेल, असा दावाही तानावडे यांनी केला आहे.

Advertisement
Tags :

.