For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satej Patil | शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुरघोड्यासाठी भाजपचा गट कार्यान्वित : आ. सतेज पाटील

02:05 PM Nov 07, 2025 IST | NEETA POTDAR
satej patil   शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुरघोड्यासाठी भाजपचा गट कार्यान्वित    आ  सतेज पाटील
Advertisement

        कोल्हापूरात दोन आमदार त्यांचे , सत्ता त्यांची . मग हद्दवाढ का थांबली : आ. पाटील

Advertisement

कोल्हापूर : भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच भाजपाला आत्ता मित्र पक्षांच्या कुबड्यांची गरज नसल्याचे विधान केले होते. त्याची परिणीती सध्या दिसून येत आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षामध्ये कुरघोड्या लावण्यासाठी भाजपमधील गट कार्यान्वित आहे अशी टीका विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आणि आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

सत्ताधारी पक्षातील घटक पक्षातील नेत्यांच्या भानगडी बाहेर येऊ लागल्या आहेत. हा संदर्भ देत आमदार सतेज यांनी भाजप आणि महायुतीवर निशाणा साधला. शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षामध्ये कुरघोड्या लावण्यासाठी भाजपमधील गट कार्यान्वित आहे. आमदार पाटील म्हणाले, खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात कोल्हापूरच्या प्रश्नांची सत्ताधाऱ्यांना जाणीव करून दिली. कोल्हापूरचे प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना बगल देत काउंटर करण्याचा प्रयत्न केला.

Advertisement

काँग्रेसच्या काळात श्री अंबाबाई विकास आराखड्यासाठी निधी आला होता. त्यानंतर केवळ जीआर आणि घोषणा झाल्या. एक रुपयाचाही निधी दिला नाही. शहरातील रस्त्यांबद्दलही आमदार सतेज पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. सरकार त्यांचे हद्दवाढ का थांबली बुधवारी पुन्हा एकदा कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न उपस्थित झाला. राज्यात महायुतीचे सरकार आहे. कोल्हापूरात दोन आमदार त्यांचे आहेत, सत्ता त्यांची आहे. मग हद्दवाढ का थांबली असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी केला.

डब्बल स्टार मतदार याद्या राजकीय पक्षांना द्याव्या
मतदार याद्यांमध्ये दुबार नांव असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गडबड होऊ नये म्हणून दुबार नावांना डब्बल स्टार केल्याचे म्हंटले आहे. या डब्बल स्टार मतदार याद्या राजकीय पक्षांना द्याव्यात अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली.

Advertisement
Tags :

.