For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज ठाकरेंशी युतीकरून भाजप कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांची मते मागणार

05:44 PM Mar 21, 2024 IST | Abhijeet Khandekar
राज ठाकरेंशी युतीकरून भाजप कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांची मते मागणार
Advertisement

काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा सवाल

Advertisement

भारतीय जनता पक्षाने राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीत घेऊन उत्तर भारतीय बांधवांचा विश्वासघातच नाही तर त्यांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लावला आहे. उत्तर भारतीय बांधवांना लाठ्या काठ्यांनी मारणाऱ्या राज ठाकरेंना सोबत घेऊन भाजप कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांची मते मागणार आहे, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे.

यासंदर्भात लोंढे म्हणाले, छट पूजेला विरोध करणारे, उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्या तसेच नेहमी उत्तर भारतीयांचा द्वेष करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेला भाजप निवडणुकीसाठी महायुतीत घेत आहे. हा तमाम हिंदी भाषकांचा अपमान आहे, त्यांच्याशी गद्दारी आहे. ‘अब की बार 400 पार’च्या वल्गणा करणाऱ्या भाजपला ‘एरा गैरा नत्थू खैरा’, ज्या पक्षाकडे एखादा आमदार आहे त्यांना सोबत घेण्याची गरजच का पडावी? ज्या उत्तर भारतीयांना मनसेने मुंबईतून हुसकावून लावले त्यांच्या गृहराज्यात भाजपला मते मागण्याचा अधिकार राहिलेला नाही. राज ठाकरेंच्या मनसेशी युती करण्याची वेळ भाजपवर आली याचाच अर्थ भाजपने महाराष्ट्रात तरी लढाईच्या आधीच पराभव मान्य केल्यासारखे आहे.

Advertisement

भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कटकारस्थान करून पाडले, त्यानंतर उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष व चिन्हही चोरले, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाही फोडला, एवढे करूनही भाजपला महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक अवघड जात आहे हे दिसल्यानेच त्यांना ठाकरेंच्या विरोधात दुसरा ठाकरे उभा करावा लागतो एवढी नामुष्की भाजपवर आलेली आहे. भाजप लोकसभा जिंकण्यासाठी काहीही करो परंतु त्यांचा पराभव अटळ आहे, असेही अतुल लोंढे म्हणाले.

Advertisement
Tags :

.