महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

तीन राज्यांमध्ये भाजपचं सरकार येणार! : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

02:19 PM Dec 01, 2023 IST | Kalyani Amanagi
Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

Advertisement

पाच राज्यांतील झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. आज पाचही राज्यांचे सर्वात अचूक एक्झिट पोल आले आहेत. दरम्यान पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचा सरकार असेल अशी प्रतिक्रिया गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

Advertisement

आज राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणाचे एक्झिट पोल आले आहेत. यानंतर प्रत्येक पक्षाचे राजकीय नेते आपलचं सरकार येणार अशी प्रतिक्रिया देत आहे. दरम्यान पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचा सरकार असेल आणि दोन राज्यांमध्ये भाजपला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. ते आज कोल्हापुर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Advertisement
Tags :
bjp promodsawantResultstateelection
Next Article