कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Satej Patil News : भाजपला शिवसेना, राष्ट्रवादी जिवंत ठेवायची नाही; सतेज पाटलांचं टीकास्त्र

12:58 PM Oct 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

                                                 करवीर मतदारसंघात कार्यकर्त्यांना सतेज पाटील यांनी दिला आधार

Advertisement

कोल्हापूर :  पन्हाळा तालुक्यातील काँग्रेसवर प्रेम करणाऱ्या नागरिकांबरोबर डी. वाय. पाटील, यशवंत एकनाथ पाटील, आमदार पी. एन. पाटील होते. आज पुन्हा काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून आमदार सतेज उर्फ बंटी पाटील तुमच्याबरोबर आहे. काही अडचण आल्यास सोबत आहे, आगामी जिल्हा परिषद, तालुका पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकवू, अशा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Advertisement

करवीर विधानसभा मतदारसंघातील यबलूज, बाजार भोगाव, कळे या तीन जिल्हा परिषद मतदारसंघाच्या पन्हाळा तालुक्यातील गावातील कार्यकर्त्यांची रविवारी काँग्रेस भवन येथे बैठक आयोजिली होती. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. आमदार पाटील म्हणाले, पन्हाळा तालुक्यातील लोकांचे ३० ते ४० वर्ष काँग्रेससोबत ऋणानुबंध आहेत. या लोकांच्या संघर्ष पाचवीला पूजलेला आहे. त्यामुळे जि.. पं. समितीचे आरक्षण १३ तारखेला जाहीर होईल. तरी तयारीला लागा.

महायुती काय देऊ शकत नाही

महायुती सरकारने मराठवाडा येथे दुष्काळग्रस्तांना अजूनही मदत केलेली नाही. काँग्रेसच्यावतीने आम्ही मदत पाठवली, सरकार मात्र काहीच करत नाही. आम्ही अनेकांना सुचना दिल्या आहेत. सरकारची कामेही काळजीपूर्वक करा, कारण भविष्यात आपल्यालाही बिले मिळतील, याची खात्री देता येत नाही. शेतकरी होरपळत आहे, बीज बिल वाढत आहे, जीएसटी नावालाच कमी केला आहे, किरकोळमध्ये आहे तसाच जीसटी असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

भाजपला शिवसेना राष्ट्रवादी जिवंत ठेवायची नाही

महायुतीमध्ये प्रचंड संघर्ष सुरु आहे. भाजपला शिवसेना आणि राष्ट्रबादी जिवंत ठेवायची नाही. पुण्यातील काँग्रेसचे जुने कार्यकर्ते भेटले. ते म्हणाले, भाजपने आपल्या मर्जीची प्रभाग रचना केली आहे. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादीचा विचारही केला नाही. भाजपला महायुतीतील दोन्ही पक्ष संपवायचे आहेत, फोटोत महायुती एकत्र असली तरी त्यांच्यामध्ये संघर्ष आहे, अशी टिकाही त्यांनी केली.

पन्हाळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जयसिंग हिर्डेकर यांनी स्थानिकस्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस म्हणून लढवण्याचं आणि काँग्रेसशी एकनिष्ठ राहण्याचे अभिवचन दिले. निवास पाटील यांनी सतेज पाटील यांनी राज्याचे, जिल्ह्याचे नेतृत्व करत असताना पन्हाळा तालुक्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली.

यावेळी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, बयाजी शेळके, माजी नगरसेवक प्रविण केसरकर, पन्हाळा तालुका काँग्रेस उपाध्यक्ष पां. वि. पाटील, सुनील पाटील, दिनकर पाटील, सागर भुमकर, रावसाहेब पाटील, बी. आर. पाटील, राजू म्हामुलकर, प्रकाश पाटील, अर्जुन पाटील, अरुण तळेकर मनोहर पाटील, बिलास पाटील, हंबीरराव चौगुले, आदी उपस्थित होते. तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
. Satej Patil@KOLHAPUR_NEWS#politicalnewscongrresskolhapurkolhapurpoliticsmaharstraPolitics
Next Article