भाजपकडून भजनी मंडळांना साहित्य वाटप
सावंतवाडी । प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी भजन मंडळाला 25 हजार रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. खऱ्या अर्थाने कोकणातील आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी मंडळांना आता शासनाचा हक्काचा निधी उपलब्ध झाला आहे. मात्र आम्ही भाजपच्या माध्यमातून भजनी मंडळांना एक फूल ना फुलाची पाकळी म्हणून भक्तीसेवा यासाठी भजनी मंडळांना टाळ ,तबला ,मृदुंग अशी भेट देण्याचा उपक्रम राबविला असून भजनी मंडळाने ही कला अशीच अविरत ठेवावी आणि भक्तीचा मेळा अधिक फुलवावा. असे मत भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे यांनी व्यक्त केले. सावंतवाडी शहर व आंबोली मंडळ विभागातील भजनी मंडळांना आज संदीप गावडे यांच्या हस्ते भजन साहित्य वाटप सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात करण्यात आले यावेळी जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर ,भाजपचे माजी नगरसेवक ॲड. परिमल नाईक ,मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, पंढरी राऊळ. सभापती पंकज पेडणेकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे ,सरपंच सागर ढोकरे, सेवानिवृत्त सैनिक संघटनेचे जिल्हा सचिव संजय सावंत , माजी सैनिक प्रकाश सावंत , राजेश पास्ते, प्रकाश धुरी आधी उपस्थित होते. यावेळी सावंतवाडी शहर व माडखोल कोलगाव ,आंबोली जिल्हा परिषद मतदार संघातील प्रत्येक गावनिहाय तीन भजनी मंडळांना हे साहित्य वाटप करण्यात आले.