महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची भाजपकडून मागणी

11:29 AM Sep 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : मुडा प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी मंगळवारी बेळगाव जिल्हा भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले. चन्नम्मा चौक येथे मुख्यमंत्र्यांविरोधात निदर्शने करत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मुडा प्रकरणामुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा डागाळली असून त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली. मंगळवारी भाजपतर्फे संपूर्ण राज्यभर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत होते. याचाच एक भाग म्हणून बेळगावमध्येही भरपावसात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात आंदोलन केले. यावेळी माजी आमदार अनिल बेनके, संजय पाटील, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, धनंजय जाधव, गीता सुतार, डॉ. सोनाली सरनोबत, मुरुगेंद्रगौडा पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article