For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Jayant Patil | भाजपने प्रचंड मेहनत घेऊन 'इंडिया' आघाडीचा पराभव केला; जयंत पाटलांचा खोचक टोला

12:48 PM May 05, 2026 IST | NEETA POTDAR
jayant patil   भाजपने प्रचंड मेहनत घेऊन  इंडिया  आघाडीचा पराभव केला  जयंत पाटलांचा खोचक टोला
Advertisement

                'इंडिया' आघाडीच्या पिछाडीवर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया

Advertisement

सांगली : इंडिया आघाडीतीलमहत्वाचे घटक पक्ष असलेले तृणमूल काँग्रेस, डीएमके या पक्षांचा पराभव झाला. भाजपने प्रचंड मेहनत घेवून हा विजय मिळविला असल्याचे दिसून येते, असा टोला शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष व आ. जयंत पाटील यांनी लगावला.

शक्तीपीठला लोकांचा विरोध आहे, मोठ्या प्रमाणात जमिनी जाणार असल्याने नाराजी असून पर्यायी मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया देताना आ. पाटील बोलत होते.

Advertisement

ते म्हणाले,निवडणुकीत मतदारांनी स्थानिक प्रश्न, विकासकामे २ आणि जनतेशी जोडलेले नेतृत्व यांना प्राधान्य दिल्याचे मत व्यक्त केले. निवडणुकीतील निकाल हे लोकशाहीतील जनतेच्या भावना व्यक्त करणारे असतात.प्रत्येक पक्षाने या निकालांचा अभ्यास करून पुढील वाटचाल ठरवावी लागेल. काही राज्यांमध्ये सत्तांतर झाले असले तरी देशातील राजकीय परिस्थिती सतत बदलणारी असून आगामी काळात विरोधी पक्ष अधिक ताकदीने जनतेसमोर येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शक्तिपीठला लोकांचा विरोध आहे. सांगली, सोलापूरसह अनेकजिल्ह्यातून शक्तीपीठला विरोध होत आहे. लोकांच्या जमिनी जात असल्याने प्रचंड नाराजी आहे. मुख्यमंत्र्यांना भेटून शक्तीपीठसाठी पर्यायी मार्ग काढावा, अशी विनंती करणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.

ते म्हणाले, सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त केली. जिल्हा बँकेने शंभर वर्षांचा प्रवास पूर्ण करताना शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलेले योगदान उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी बँकेची आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे जिल्हा बँकेने विश्वास टिकवून ठेवला आहे.

Advertisement
Tags :

.