महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भाजपची 4 लाख सदस्य नोंदणी पूर्ण

12:30 PM Nov 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची माहिती : डिसेंबर अखेरपर्यंत प्रदेश अध्यक्षांची होणार निवड

Advertisement

पणजी : गोव्यात भारतीय जनता पक्षाचे 4 लाख नव्याने सभासद करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचा दावा प्रदेश भाजपचे अध्यक्ष व राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांनी केला आहे. शिवाय भाजप संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया डिसेंबर 2024 शेवटपर्यंत पूर्ण होऊन त्यावेळी प्रदेश अध्यक्षांची निवड होणार असल्याची माहिती तानावडे यांनी दिली. भाजप संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी काल रविवारी बैठक झाली. त्यात भाजप मंडळ समिती, पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यांना मार्गदर्शन करण्यात येऊन निवडणूक प्रकियेची माहिती देण्यात आली. एकूण 4 लाख नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने आता निवडणूक प्रक्रिया सुरु होणार असल्याचे तानावडे म्हणाले.

Advertisement

निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी 29 नोव्हेंबर रोजी कार्यशाळा घेण्यात येणार असून त्यात भाजप सदस्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकारी रेखा वर्मा आणि राज्याचे प्रभारी आशिष सुद हे कार्यशाळेसाठी उपस्थित राहून संघटनात्मक निवडणुकीविषयी प्रबोधन करणार आहेत. त्यात एकंदरित निवडणुकीचा कार्यक्रम ठरवण्यात येणार आहे. तो नंतर जाहीर केला जाणार आहे. भाजपची राष्ट्रीय स्तरावरही निवडणूक प्रक्रिया चालू असून ती जानेवारीपर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले. आढावा बैठकीत पक्ष निवडणूक अधिकारी प्रेमानंद म्हांबरे, मंत्री सुभाष शिरोडकर, सभापती रमेश तवडकर, विश्वास सतरकर, नरेंद्र सावईकर, फ्रान्सिस सिल्वेरा व इतर नेतेमंडळी हजर होती.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article