महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विधानसभा अधिवेशनात भाजपने केली फसवेगिरी

11:55 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा आरोप

Advertisement

पणजी : गोवा विधानसभेच्या नुकत्याच संपलेल्या सहा दिवसीय अधिवेशनात सभापती रमेश तवडकर यांनी ‘पक्षपाती’ बनून कामगिरी केली ‘सभापती’ म्हणून कर्तव्य न बजावल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते आणि कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा आणि हळदोणाचे आमदार अॅड. कार्लुस फरेरा यांनी सहा दिवसांत प्रामाणिकपणाने आपले कर्तव्य बजावले तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने केवळ फसवेगिरी दाखवली, असे अमित पाटकर म्हणाले.

Advertisement

काँग्रेस भवनात काल सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमित पाटकर बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत व्हेरियेटो फर्नांडिस, विजय भिके, एम. के. शेख उपस्थित होते. म्हादई, एसटी आरक्षण, खाण व्यवसाय, बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी, जीवघेणे अपघात आणि इव्हेंटवरील वायफळ खर्च अशा मुद्यांवरून लक्ष वळवण्यासाठी भाजप सरकारने ‘भ्रष्टाचाराचा आरोप आणि समारोप’ हे नाटक केल्याचा दावा अमित पाटकर यांनी केला आहे.

आमच्या तीनही आमदारांनी मांडलेल्या विविध तारांकीत व अतारांकीत प्रश्नांना दिलेल्या उत्तरांवरून भाजप सरकार केवळ अच्छे दिनची कृत्रिम भावना निर्माण करण्यासाठी तथ्ये आणि आकडेवारीची फेरफार करत असल्याचे स्पष्ट होते. प्रत्यक्षात अर्थव्यवस्था, रोजगार आणि कायद्याची अंमलबजावणी या सर्वच स्तरावर भाजप सरकार अपयशी ठरले आहे. सरकारकडे विविध सरकारी विभागांकडून जवळपास 5000 कोटींची वसुली प्रलंबित आहे. यामध्ये 271.75 कोटींची खाण थकबाकी, 230.35 गोवा ग्रामीण सुधारणा आणि कल्याण उपकर, हरित उपकराची वसुली, औद्योगिक, व्यावसायिक आणि सरकारी थकबाकीदारांकडून 1460.78 कोटींची वीज बिलांची वसुली, कॅसिनो थकबाकी इत्यादींचा समावेश आहे, असे विधानसभेत दिलेल्या माहितीवऊन उघड झाले आहे, असे अमित पाटकर यांनी नमूद केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article