महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

निवडणुकांमधील यशाने भाजपचा आनंदोत्सव

10:59 AM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : तेलंगणा वगळता राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे भाजपतर्फे देशभर आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. बेळगावच्या राणी चन्नम्मा चौकात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. चार राज्यांमधील निवडणुकांचा निकाल रविवारी जाहीर होणार होता. सकाळपासूनच निवडणुकांचे कल बाहेर पडत असल्याने नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने या निकालांचे परिणाम निवडणुकांवर जाणवण्याची शक्यता आहे. दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट झाल्याने भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. बेळगावमध्येही भाजप महानगरतर्फे राणी चन्नम्मा चौकात विजयोत्सव साजरा झाला. माजी आमदार संजय पाटील, अनिल बेनके, मुरगेंद्र गौडा पाटील, माध्यम प्रमुख शरद पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

मोदी हेच आमचे गॅरंटी पुन्हा जनतेची साथ

Advertisement

आज झालेल्या पाच राज्यांपैकी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने दणदणीत विजय प्राप्त करून स्पष्ट बहुमत मिळविले. याबद्दल सर्व नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपच्या विकासाला देशातील जनतेचा सदासर्वकाळ भक्कम पाठिंबा आहे. तसेच देशातील जनतेला डब्बल इंजिन सरकार राज्यात व केंद्रात हवे हेच या निकालानंतर पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. निवडणुकीत अपार मेहनत घेणाऱ्या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि नेतृत्वाचे मनापासून आभार व्यक्त करतो.

- महांतेश कवटगीमठ, माजी मुख्य प्रतोद विधान परिषद व भाजप नेते

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article