महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भाजपकडून सोलापूरसाठी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर

12:20 PM Mar 25, 2024 IST | Abhijeet Khandekar
MLA Ram Satpute
Advertisement

उमेदवारी जाहीर होताच राम सातपुते यांची पहिली प्रतिक्रिया

पाटकुल : प्रतिनिधी

आज संपूर्ण देशात अनेक दिग्गज नेते भजपाकडून तिकीट मिळवण्यासाठी देव पाण्यात ठेवून आहेत. याला अपवाद ठरले माळशिरसचे विद्यमान आमदार रामभाऊ सातपुते. कोणताही राजकीय वारसा नसलेला तरुण आमदार झाल्यानंतर आपल्या कामातून आपला ठसा संपुर्ण राज्यात उमटविला याचीदखल देश पातळीवरील घेतली गेली. दिग्गज नेते सोलापूर मध्ये असतानादेखील पक्षाला विजयासाठी आश्वासक चेहरा म्हणून फक्त रामभाऊ सातपुते हेच नाव पुढे आले आहे. सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्ती आपल्या कर्तृत्वातून काय करू शकतो हे उदाहरण सर्व पक्षांतील उमेदवारांसाठी आहे.

Advertisement

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला उमेदवारी दिली, त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. 'सच्चा कार्यकर्त्यांना संधी' हे माझ्या पक्षाचे वैशिष्ट्य आहे आणि हे तत्व पक्ष काटेकोरपणे पाळतो, याचा खरोखर अभिमान वाटतो.

Advertisement

विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक क्षेत्रात मी पहिलं पाऊल टाकलं. पुढे माळशिरसच्या जनतेने दिलेल्या संधीनंतर आमदार म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास घेऊन कामाला लागलो. थेट जनतेसाठी काम करण्याची ही माझी पहिली संधी होती. या संधीचं सोनं करण्यासाठी झोकून देऊन काम केलं. गोरगरिबांची दुःखं समजून घेऊन त्यांच्यासाठी शक्य ती सर्व कामे करण्याचा प्रयत्न करत आलो. या माध्यमातून माझ्यावर जनतेने टाकलेल्या विश्वासाला न्याय देण्यात मी यशस्वी ठरलो, अशी माझी प्रामाणिक भावना आहे.

यातूनच माळशिरसकरांसह सोलापूरसोबत देखील माझे ऋणानुबंध जुळले गेले आहेत. त्यामुळे पक्षाने दिलेल्या या संधीच्या माध्यमातून सोलापूरच्या जनतेसाठी काम करण्यासही मी त्याच उमेदीने सज्ज आहे. कामाची व्याप्ती वाढणार असली तरी सोलापूरमधील म्हणजे आपल्याच लोकांसाठी मला काम करायचं आहे, ही माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे पक्षाने माझ्यावर सोपविलेल्या या जबाबदारीचा मी विनम्रतेने स्वीकार करतो. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन जनतेच्या प्रेमाच्या जोरावर सोलापूर लोकसभा मतदारसंघातही नक्कीच मोठा विजय मिळवू, असा विश्वास आहे.

Advertisement
Tags :
#malshirasBJP candidatureMLA Ram Satputesolapur
Next Article