महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भाजप उमेदवार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

10:21 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कारवार मतदारसंघात अद्यापपर्यंत चार अर्ज दाखल

Advertisement

कारवार : कारवार लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या गुरुवारी पहिल्या दिवशी चार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांचा समावेश आहे. हेगडे-कागेरी उमेदवारी दाखल करताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, भाजपचे राज्य प्रधान कार्यदर्शी सुनील कुमार, कारवारच्या माजी आमदार आणि भाजपच्या राज्य उपाध्यक्षा रुपाली नाईक उपस्थित होत्या. कागेरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अरबी समुद्राची पूजा केली. शिवाय त्यांनी येथील सिद्धिविनायक मंदिरात पूजा केली. येथील दैवज्ञ ब्राह्मण कल्याण मंडपापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भाजपने मिरवणूक काढून शक्तीप्रदर्शन केले. दरम्यान भाजपचे हेगडे-कागेरी यांच्याशिवाय सोशलिस्ट युनीटी सेंटर ऑफ इंडिया पक्षाचे उमेदवार गणपती वेंकटरमन हेगडे, के.आर.एस. पक्षाचे उमेदवार विनायक मंगेश नायक आणि अपक्ष उमेदवार कृष्णा हणुमंतप्पा बळेगार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article