For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजप उमेदवाराचा मतदानानंतर मृत्यू

06:15 AM Apr 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजप उमेदवाराचा मतदानानंतर मृत्यू
Advertisement

मुरादाबाद मतदारसंघातून रिंगणात

Advertisement

वृत्तसंस्था/ मुरादाबाद

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कुंवर सर्वेश सिंह यांचे शनिवारी निधन झाले. वयाच्या 71 व्या वषी रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजता दिल्ली एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते कर्करोगाने त्रस्त होते. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी 19 एप्रिल रोजी या जागेवर मतदान झाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपच्या उमेदवाराचा मृत्यू झाला आहे. मुरादाबादमध्ये सुमारे 60 टक्के मतदान झाले होते, तर 2019 मध्ये याच जागेवर 65.39 टक्के मतदान झाले होते. सर्वेश सिंह यांच्या विरोधात सपाच्या ऊची वीरा रिंगणात आहेत.

Advertisement

व्यवसायाने व्यापारी असलेले कुंवर सर्वेश कुमार सिंह हे उत्तर प्रदेशातील शक्तिशाली नेत्यांपैकी एक मानले जायचे. 2014 मध्ये सर्वेश सिंह मुरादाबादमधून खासदार झाले. खासदार होण्यापूर्वी ते ठाकूरद्वारा विधानसभा मतदारसंघातून 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 2014 मध्ये कंठ विधानसभा मतदारसंघात लाऊडस्पीकरच्या वादामुळे ते चर्चेत आले होते.

Advertisement
Tags :

.