महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

2024 मध्ये भाजप 400 चा आकडा गाठू शकतो जर ईव्हिएम....- सॅम पित्रोदा

04:00 PM Dec 28, 2023 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

नवी दिल्ली :
लोकसभा निवडणुकीपूर्वी जर देशातील ईव्हीएममशीन ठिक केल्या गेल्या नाहीत. तर भाजपा आगामी निवडणुकीत ४०० हून अधिक जागा जिंकेल, असा दावा काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले आहे. तसेच राम मंदिराबाबत त्यांनी केलेले भाष्य ‘ट्विस्टेड’ असल्याचा दावाही त्यांनी केला.

Advertisement

भारतामध्ये दूरसंचार क्रांती घडवून आणणारे काँग्रेसचे नेते आणि टेक्नोक्रॅट सॅम पित्रोदा म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मदन लोकूर अध्यक्ष असलेल्या एका सामाजिक संस्थेने VVPAT या मतदान यंत्राच्या प्रणालीची सध्याची रचना बदलण्याची मागणी निवडणुक आयोगाक़डे केली आहे."असे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

पुढे बोलताना ते म्हणाले, "निवडणूक आयोगाच्या प्रतिक्रियेची मी वाट पाहत होतो, पण आयोगाने प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळेच मी बोलायचे ठरवले आहे. पाच राज्यांतील निवडणुका संपल्या आहेत आणि 2024 ची निवडणूक येत आहे या दोघांचा काहीही संबंध नाही. मला वाटते की निवडणुक प्रक्रियेमध्ये विश्वासाची कमतरता आहे. या अहवालाच्या आधारे निवडणूक आयोगाने नागरिकांमध्य़े विश्वासाची पुनर्बांधणी करण्यासाठी प्रतिसाद दिला पाहिजे." असे अवाहन त्यांनी केले.

पत्रकारांनी विचारलेल्य़ा 2024 च्या निवडणुकीमध्ये भाजप 400 चा टप्पा ओलांडू शकेल का? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले "ईव्हीएम व्यवस्थित नसल्यास ते शक्य आहे. ते देशाने ठरवायचे आहे. पुढील निवडणुकीपूर्वी ईव्हीएम मशिन्स ठिक करणे आवश्यक आहे. जर ईव्हीएम मशिन्स बदलले नाहीत, तर 400 चा आकडा खरा ठरू शकतो. आणि जर ईव्हीएममध्ये बदल केला नाही तर 400 चा आकडा खोटा ठरू शकतो.” असे मत त्यांनी व्यक्त केले.

Advertisement
Tags :
bjpcongressEVMSam Pitrodatarun bharat news
Next Article