महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपकडून निरीक्षक नियुक्त

06:49 AM Dec 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तीन राज्यात नव्या नेत्याची निवड रविवारी होणे शक्य

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवून जवळपास एक आठवडा होत आल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने या राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. या सर्व राज्यांमध्ये रविवारी नवे मुख्यमंत्री नियुक्त केले जातील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

राजस्थानच्या केंद्रीय निरीक्षकांची नावे घोषित करण्यात आली असून त्यांच्यात केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंग, महाराष्ट्रातील नेते विनोद तावडे आणि सरोज पांडे यांचा समावेश आहे. मध्यप्रदेशसाठी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, के. लक्ष्मण आणि आशा लाक्रा या नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर छत्तीसगडसाठी केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, सर्बानंद सोनोवाल आणि दुष्यंत गौतम यांना नियुक्त करण्यात आले आहे. हे सर्व निरीक्षक त्यांच्या त्यांच्या राज्यांमध्ये आज शनिवारी पोहचणार असून नवनिर्वाचित आमदारांसह चर्चा करणार आहेत. नंतर या तीन राज्यांमध्ये विधिमंडळ पक्षाच्या बैठका आयोजित करण्यात येणार असून या बैठकांमध्ये मुख्यमंत्र्यांची निवड आमदारांकडूनच करण्यात येणार आहे. केंद्रीय निरीक्षक या बैठकांमधील कामकाजाचे निरीक्षण करणार आहेत.

सहा निकष निर्धारित

या तीन राज्यांमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय अद्यापही झालेला नाही. मुख्यमंत्र्यांची निवड करताना समाजघटक, विभाग, नेतृत्व क्षमता, प्रशासकीय क्षमता आणि पक्षनिष्ठा आणि जनसंपर्क क्षमता हे निकष प्रामुख्याने उपयोगात आणण्यात येतील, अशी माहिती भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी दिली.

रविवारी बैठका शक्य

राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी रविवारी बैठका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बैठकांमध्ये निर्विरोध पद्धतीने मुख्यमंत्र्यांची निवड व्हावी, अशी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची अपेक्षा असून ती पूर्ण होईल, अशाप्रकारे योजना करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांची निवड झाल्यानंतर सोमवारी किंवा मंगळवारी त्यांचा शपथविधी केला जाणे शक्य आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

इच्छुकांच्या गाठीभेटी सुरुच

या तिन्ही राज्यांमधील अनेक नेते मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचे समजते. हे नेते सध्या दिल्लीत असून केंद्रीय नेतृत्वाशी त्यांची चर्चा अद्यापही होत आहे. केंद्रीय नेतेही त्यांना समजून घेत असून कोणत्याही मतभेदांशिवाय मुख्यमंत्री निवडले जावेत या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

भाजपचे घवघवीत यश

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतगणना गेल्या रविवारी पार पडली आहे. या पाच राज्यांपैकी राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रचंड विजय झाला आहे. राजस्थानात पक्षाला 199 पैकी 116, मध्यप्रदेशात 230 पैकी 163 आणि छत्तीसगडमध्ये 90 पैकी 54 स्थाने प्राप्त झाली आहेत. त्यामुळे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी हा पक्ष अधिक उत्साहाने सज्ज झाल्याचे दिसत आहे.

 

वादविवादाशिवाय निवडीचा प्रयत्न

ड आमदारांमध्ये कोणतेही वादविवाद न होता मुख्यमंत्री निवडीसाठी प्रयत्न

ड राजस्थान आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांसंबंधी सर्वांना सर्वाधिक उत्सुकता

ड तिन्ही राज्यांमधील मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोमवारी होण्याची शक्यता

ड केंद्रीय निरीक्षकांकडून विधिमंडळ बैठकांचे बारकाईने निरीक्षण केले जाणार

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article