For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपकडून पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर

06:25 AM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजपकडून पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर
Advertisement

पंजाबमधील एक, बंगालच्या 4 जागांसाठी घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भाजपने पंजाब आणि पश्चिम बंगालमधील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपच्या या यादीत बंगालच्या 4 तर पंजाबच्या एका मतदारसंघाच्या उमेदवाराचे नाव आहे. भाजपने जालंधर पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शीतल अंगुराल यांना उमेदवारी दिली. 7 राज्यांच्या 13 जागांकरता 10 जुलै रोजी पोटनिवडणूक होणार असून 13 जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहे.

Advertisement

अंगुराल 2022 मध्ये आम आदमी पक्षाच्या तिकिटावर जालंधर पश्चिम मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. परंतु त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसेच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.  लोकसभा निवडणुकीनंतर राजीनामा मागे घेण्यासाठी त्यांनी विधनासभा अध्यक्षांना पत्र लिहिले होते, परंतु विधानसभा अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा त्यापूर्वीच मंजूर केला होता.

तर पश्चिम बंगालच्या रायगंज येथे मानस कुमार घोष, राणाघाट दक्षिण येथे मनोज कुमार बिस्वास, बगदा येथे विनय कुमार बिस्वास आणि मानिकतला येथे कल्याण चौबे भट्टाचार्य यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

Advertisement
Tags :

.