For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बी. नागेंद्र यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून भाजप आक्रमक

06:46 AM Aug 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
बी  नागेंद्र यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून भाजप आक्रमक
Advertisement

राणी चन्नम्मा चौकात आंदोलन : बडतर्फ करण्याची मागणी  

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यक्तींना पुन्हा मंत्रिपद देण्यात आले आहे. याच्या निषेधार्थ जिल्हा भाजपच्यावतीने कित्तूर राणी चन्नम्मा चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी बी. नागेंद्र यांना मंत्रिमंडळातून तातडीने बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली.

Advertisement

भाजप कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करत मंत्रिमंडळ विस्ताराचा निषेध नोंदवत मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व बी. नागेंद्र यांचे पोस्टर पेटविण्यात आले. स्वच्छ, पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याचे आश्वासन देत काँग्रेस सत्तेवर आली होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांना सामोरे गेलेल्या व्यक्तींना पुन्हा मंत्रिपद देऊन सरकारने स्वत:च्या आश्वासनालाच हरताळ फासला आहे. अनुसूचित जमाती कल्याण मंत्री म्हणून कार्यरत असताना 187 कोटी ऊपयांच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणात नाव आलेले बी. नागेंद्र यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

सरकारने बी. नागेंद्र यांना तातडीने मंत्रिमंडळातून वगळावे. तसेच भ्रष्टाचाराविरोधातील आपली भूमिका स्पष्ट करावी. आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली. भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या निर्णयांचा निषेध करत जनतेच्या विश्वासाशी तडजोड करणारे निर्णय सरकारने मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, विधानपरिषद सदस्य लिंगराज पाटील, माजी आमदार संजय पाटील, माजी आमदार अरविंद पाटील, माजी आमदार महांतेश दो•गौडर, शहराध्यक्ष गीता सुतार यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Advertisement
Tags :

.