For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांकवाळ अपघातात ‘बिटस् पिलानी’चा विद्यार्थी ठार

02:40 PM Mar 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
सांकवाळ अपघातात ‘बिटस् पिलानी’चा विद्यार्थी ठार
Advertisement

वास्को : सांकवाळ-झुआरीनगर येथील महामार्गावर झालेल्या अपघातात एक युवक ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. हे दोघेही युवक बिटस् पिलानीचे विद्यार्थी आहेत. त्यांच्या दुचाकीची धडक टँकरला बसली. मयत युवकाचे नाव करण एन. नृसिंहमूर्ती (25 वर्षे) असे असून तो म्हैसूर कर्नाटकचा आहे. जखमी युवकाचे नाव सोहन अधिकारी (26 वर्षे) असे आहे.वेर्णा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास सांकवाळ झुआरीनगर येथील झेडआयओटीलच्या नाक्यावर घडला. बिटस्च्या गोवा कॅम्पसमधील हे दोघे विद्यार्थी आपल्या दुचाकीवरून वेर्णाच्या दिशेने जात होते. झेडआयओटीएलच्या नाक्यावर एक इंधनवाहू टँकर वळण घेत होता. त्या टँकरच्या वळण्यावेळी चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण गेले. त्यामुळे दुचाकीची धडक त्या टँकरच्या मागच्या टायरला बसली व दोघेही रस्त्यावर कोसळले. दुचाकी चालवणाऱ्या करण या युवकाला मृत्यू आला. सोहम गंभीर जखमी झाला. त्याला गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. या अपघात प्रकरणी वेर्णा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.