For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Nail Eating Addiction | स्वतःची संपली की मुलीचीही पायाची नखं खाते; पर्समध्ये ठेवते नखांचा साठा, 'या' शोमध्ये झाला धक्कादायक खुलासा

01:26 PM Jun 10, 2026 IST | NEETA POTDAR
nail eating addiction   स्वतःची संपली की मुलीचीही पायाची नखं खाते  पर्समध्ये ठेवते नखांचा साठा   या  शोमध्ये झाला धक्कादायक खुलासा
Advertisement

 Nail Eating Addiction -टीएलसी चॅनेलचा शो 'माय स्ट्रेंज एडिक्शन' नेहमीच विचित्र सवयींच्या कहाणींसाठी प्रसिद्ध राहिला आहे. परंतु यावेळी जे प्रकरण समोर आले आहे ते पाहून लोकांना धक्काच बसला आहे. अमेरिकेत जेनी नाव असलेल्या महिलेने स्वतःच्या २६ वर्षे जुन्या सवयीचा शोमध्ये खुलासा केला आहे. जेनी स्वतःच्या पायांची नखं खात असते. बालपणापासूनच मला नखं चावण्याची सवय होती. परंतु नंतर ही पायांच्या नखांपर्यंत सवय बाढली. माझ्या पायाची नखं खाऊनसंपल्यावर मी मुलीच्या पायांची नखं खाऊ लागते. स्वतःच्या पर्समध्ये वेगवेगळ्या नखांचा साठाच घेऊन चालते. जेव्हा मला गरज जाणवते, तेव्हा पर्समधून नखं बाहेर काढत खाऊ लागते असे जेनीने सांगितले आहे.

Advertisement

परिवाराला त्रास

जेनीची मुलगी आणि कुटुंबीय तिच्या या सवयीमुळे त्रस्त आहेत. आई माझी नखं खात असल्याने मला अत्यंत वाईट वाटते असे तिची मुलगी सांगते. ही सवय थेरपिस्ट आणि तज्ज्ञ तिला या सवयीपासून मुक्तता मिळवून देण्यासाठी समुपदेशन अन् थेरपी देताना दिसून आले.

Advertisement

वैद्यकीय पैलू

डॉक्टरांनुसार हे एकप्रकारचे बॉडी फोकस्ड रिपीटिटिव्ह बिहेवियर आहे.लोक स्वतःचे केस, नखं, त्वचा इत्यादी वारंवार तोडतात किंवा चाबू लागतात. तणाव, चिंता किंवा काही मनोवैज्ञानिक कारणांमुळे ही सवय विकसित होत. जेनीच्या प्रकरणात हे २६ वर्षांपासून चालत राहिले आहे, जे अत्यंत दुर्लभ आहे. जर एखादा व्यक्ती नख, केस किंवा त्वचेचा भाग खाण्यासारखी सवय दाखवत असल्यास त्वरित डॉक्टर किंवा मनोचिकित्सकाशी संपर्क साधावा. प्रारंभिक टप्यातच हे रोखले जाऊ शकते. व्यायाम, ध्यान आणि छंद अवलंबिल्याने मदत मिळू शकते, असे तज्ज्ञांचे सांगणे आहे.

Advertisement
Tags :

.