For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

बिटकॉईन 71,000 डॉलरच्या घरात

06:18 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
बिटकॉईन 71 000 डॉलरच्या घरात

नवी दिल्ली :

Advertisement

बिटकॉइन (बीटीसी) ने सोमवारी, 11 मार्च रोजी प्रथमच 71,000 डॉलरची पातळी गाठली होती. स्पॉट बिटकॉइन एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ईटीएफ) ला अमेरिकेत दोन महिन्यांपूर्वी 11 जानेवारी रोजी मान्यता मिळाल्यापासून, त्यात सातत्याने वाढ होत आहे. तेव्हा बिटकॉइनची किंमत सुमारे 46,000 डॉलर होती. आताची वाढलेली किमत पाहता बिटकॉइनची किंमत 54 टक्क्यांनी वाढली आहे. बिटकॉइनच्या वाढीचा परिणाम संपूर्ण क्रिप्टो मार्केटवर दिसून येत आहे. दुसरी सर्वात मोठी क्रिप्टो इथरियमने देखील 4,000 डॉलरचा टप्पा पार केला आहे.

 बिटकॉइनचे भविष्य अद्यापही अस्पष्ट

Advertisement

बिटकॉइनसह इतर अनेक क्रिप्टोकरन्सी वाढत आहेत, परंतु त्याचे भविष्य अद्याप अस्पष्ट आहे. अशा परिस्थितीत किरकोळ गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणून सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेऊ शकतात, परंतु त्यांनी सावधगिरी बाळगणे देखील आवश्यक आहे.

Advertisement

वाढण्याची कारणे

-स्पॉट बिटकॉइन ईटीएफ सुरू झाल्यापासून क्रिप्टोसाठीची भावना सकारात्मक झाली आहे.

-एप्रिल 2024 मध्ये बिटकॉइनचा पुरवठा कमी होईल.

-अर्थव्यवस्था स्थिर झाल्यावर फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवू शकते असे गुंतवणूकदारांचे मत आहे.

-क्रिप्टोचे भविष्य स्पष्ट नाही, गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

Advertisement
Tags :
×

.