For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्मार्टफोन स्क्रीन गार्डसाठी बीआयएस नोंदणी बंधनकारक

06:45 AM Sep 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्मार्टफोन स्क्रीन गार्डसाठी बीआयएस नोंदणी बंधनकारक
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

सरकारने स्मार्टफोन क्रीन गार्डसाठी बीआयएस नोंदणी अनिवार्य केली आहे. या नवीन निर्णयाचा थेट परिणाम बाजारात विकल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या क्रीन गार्डवर होईल. आता कंपन्यांना बीआयएसची चाचणी उत्तीर्ण झाल्यावरच ते विकण्याची परवानगी मिळेल. केंद्र सरकारने स्मार्टफोन वापरकर्त्यांची सुरक्षा आणि क्रीन गार्डचा दर्जा सुधारण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

नवीन नियम 1 एप्रिल 2027 पासून मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, स्मार्टफोन क्रीन गार्डसाठी निश्चित केलेले नवीन ँघ्ए मानक 1 एप्रिल 2027 पासून देशभरात लागू केले जातील. याचा अर्थ असा की, 2027 नंतर बीआयएस नोंदणीशिवाय आणि निश्चित मानकांशिवाय क्रीन गार्डच्या विक्रीवर बंदी घालण्यात येईल.

Advertisement

ग्राहक आणि कंपन्यांवर काय परिणाम होईल?

ग्राहक लाभ: बाजारात उपलब्ध असलेल्या स्वस्त, बनावट आणि सहज फुटणाऱ्या क्रीन गार्ड्सपासून सुटका. गुणवत्तेच्या मानकांमुळे डिस्प्ले सुरक्षित राहील.

कंपन्यांसाठी अट: कंपन्यांना त्यांची उत्पादने बीआयएस लॅबमध्ये तपासावी लागतील. बीआयएस मार्क नसलेल्या क्रीन प्रोटेक्टर्सच्या आयातीवर आणि स्थानिक उत्पादनावर बंदी घातली जाणार आहे.

क्रीन गार्ड बीआयएस प्रमाणित आहे की नाही हे कसे कळेल?

एप्रिल 2027 नंतर विकल्या जाणाऱ्या क्रीन प्रोटेक्टर्सच्या पॅकेट्सवर आयएसआय मार्क आणि बीआयएसचा नोंदणी क्रमांक छापलेला असेल.

वापरकर्ते बीआयएस केअरवर हा क्रमांक तपासू शकतील. स्थानिक दुकानांमध्ये मिळणारे 50-100 चे स्वस्त क्रीन गार्ड्स बंद होणार? होय, बंद होतील.

Advertisement
Tags :

.