कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्रीमंत शाहू छत्रपती यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव; न्यू पॅलेस येथे गर्दी

12:34 PM Jan 08, 2024 IST | Abhijeet Khandekar
Shrimant Shahu Chhatrapati
Advertisement

राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
कोल्हापूर प्रतिनिधी

करवीर संस्थानचे अधीपती श्रीमंत शाहू छत्रपती यांचा 76 वा जन्मदिवस माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्यासह छत्रपती परिवाराच्या उपस्थितीत रविवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. श्रीमंत शाहू छत्रपती यांना वाढदिनी शुभेच्छा देण्यासाठी न्यू पॅलेस येथे दिवसभर गर्दी होती. राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, साहित्यिक, शैक्षणिक, सांस्कृतीक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी न्यू पॅलेस येथे गर्दी केली होती.

Advertisement

न्यू पॅलेस येथे श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेवून पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांनी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर माजी महापौर महादेव आडगुळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, मारुतराव कातवरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शहराध्यक्ष आर. के. पोवार, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, संचालक आनंद माने अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, डॉ. अर्जुन अडनाईक, हिंदकेसरी विनोद चौगुले, महाराष्ट्र केसरी विष्णु जोशीलकर, आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, दिगंबर फराकटे, अर्जून माने, राहूल माने, मोहन सालपे, ईश्वर परमार, राजाराम गायकवाड, सुयोग मगदूम, देवस्थान व्यवस्थापन समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे, शाहीर आझाद नायकवडी, आरोग्य मित्र बंटी सावंत, राजर्षी शाहू मॅरेथॉन, बिनखांबी गणेश मंदीर मित्र मंडळ आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

Advertisement

Advertisement
Tags :
birthdayShahu Chhatrapati New PalaceShrimant Shahu ChhatrapatiTarun Bhaat News
Next Article