For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाढदिवसाचे औचित्य अन् शिवरायांच्या मूर्तीचे पूजन

11:14 AM May 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
वाढदिवसाचे औचित्य अन् शिवरायांच्या मूर्तीचे पूजन
Advertisement

सांबरा येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांचा उपक्रम कौतुकास्पद

Advertisement

सांबरा : सांबरा येथे गेल्या वर्षभरापासून दररोज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे नित्य पूजन केले जाते. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेला हा उपक्रम खरोखर कौतुकास्पद असून याचे अनुकरण सर्वांनी करणे गरजेचे आहे. सध्या कोणाचाही वाढदिवस असल्यास रात्री जागून, केक कापून त्यानंतर तो केक एकमेकांच्या अंगाला फासला जातो. केक कापण्याची ही आपली संस्कृती नसून आताची युवा पिढी पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी जात आहे. यासाठी ही प्रथा कुठेतरी बंद होणे गरजेचे आहे. आजच्या तऊण पिढीने आपल्या हिंदू संस्कृतीकडे वळले पाहिजे हे ओळखून येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. गावामध्ये कोणाचाही वाढदिवस असल्यास त्याच्या हस्ते त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा केली जाते. वर्षभराहून अधिक काळ गावात हा उपक्रम सुरू असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नित्य पूजेचा सोमवारी 408 वा दिवस होता. आतापर्यंत ज्येष्ठ व लहानांसह एकूण 670 जणांना या पूजेचा मान मिळाला आहे.

32 मण सुवर्णसिंहासनासाठी देणगी

Advertisement

आतापर्यंत अनेक जणांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून 32 मण सुवर्ण सिंहासनासाठी स्वयंस्फूर्तीने देणगी दिली आहे. आतापर्यंत 36 हजार ऊपयांची देणगी देण्यात आली आहे. गावातून दीड लाख ऊपयांची देणगी 32 मण सुवर्ण सिंहासनासाठी देण्यात आली आहे.

बाराही महिने नित्य पूजा

उन्हाळा असो किंवा पावसाळा दररोज न चुकता शिवाजी महाराजांची नित्य पूजा केली जाते. या उपक्रमामुळे सामान्यातील सामान्य लोकांनाही नित्य पूजा करण्याचे भाग्य मिळत आहे. त्यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. गावामध्ये हा उपक्रम राबविण्यासाठी एकनाथ सावगावकर, भरमा चिंगळी, मोहन जोई, नागेश जत्राटी, प्रसाद कलखांबकर, मनोज चौगुले, सागर चौगुले, गजानन सावगावकर, दीपेश हवालदार, हभप भरमा धर्माजी, ज्ञानेश्वर सावगावकर आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

मूर्तीचे नित्य पूजन आवश्यक

सध्या गावोगावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती उभारण्यात आल्या आहेत. मात्र काही अपवाद वगळता छत्रपती शिवाजी महाराजांची दररोज क्वचितच पूजाक्र्  केले जाते. यासाठी सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे नित्य पूजन करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे बनले आहे.

Advertisement
Tags :

.