For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Crime News : रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्यावरून राडा, 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

10:36 AM May 20, 2025 IST | Snehal Patil
crime news   रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्यावरून राडा  16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Advertisement

याप्रकरणी पोलिसांनी 16 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

रत्नागिरी : शहरातील आझादनगर येथे रस्त्यावर केक कापण्यावरून जोरदार राडा झाला. यावेळी तरुणाच्या छातीवर चाकूने वार करून त्याला जखमी करण्यात आले. मोहम्मद शेख समीर काझी (25) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्या नातेवाईकांनाही जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना शनिवारी रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी 16 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आफताब शहबान बलबले, शादाब बलबले, साहिल बावानी, शहबाद गनी बलबले, नवाज, अरबाज व अन्य 10 ते 12 जणांवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी हे 17 मे रोजी आझादनगर बसस्टॉप येथे रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास अफताब बलबले याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जमले होते. याठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा करत असताना तक्रारदार मोहम्मद काझी हा त्याठिकाणी आला.

Advertisement

मोहम्मद याने संशयिताना तुमचे याठिकाणी काय चालले आहे, अशी विचारणा केली. याचा राग आल्याने संशयित आरोपींनी रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का, अशी विचारणा केली. रागाने संतप्त झालेल्या आफताब याने तक्रारदार याच्याकडे इशारा करत ‘यानेच माझ्या काकाला अडकविले आहे, पोलिसांना यानेच टीप दिली होती, याला सोडू नका’ असे बोलू लागला. त्यानंतर केक कापण्यासाठी आणलेल्या चाकूने मोहम्मद काझी याच्या छातीवर दोन वार केले. त्याचबरोबर अन्य संशयित आरोपी यांनी काझी याच्या डोक्यात लोखंडी सळी मारून दुखापत केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

मोहम्मद याला होत असलेली मारहाण पाहून त्याचे नातेवाईक सोडविण्यासाठी मध्ये आले. यावेळी संशयितांनी त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार रत्नागिरी शहर पोलिसात दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 118(1) नुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.