महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पासपोर्टसाठी यापुढे जन्मदाखलाच ग्राह्या

11:48 AM Nov 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : पासपोर्ट कार्यालय यापुढे आधारकार्ड जन्माचा पुरावा म्हणून स्वीकारणार नाही, तर त्यासाठी यापुढे जन्मदाखलाच सादर करावा लागणार आहे. पासपोर्टसाठी अर्ज करताना आता जन्मदाखलाच जन्माचा पुरावा म्हणून ग्राह्या धरणार आहे. त्याची कार्यवाही सुरू झाल्याची माहिती पासपोर्ट अधिकारी निजो वर्गीस यांनी दिली आहे. ते म्हणाले की, 1 ऑक्टोबर 2023 आणि त्यानंतर जन्म झालेल्या बालकांना आता पासपोर्टसाठी जन्मदाखला बंधनकारक आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या निर्णय घेतला आहे. यापूर्वी आधार कार्डवरील जन्म तारीख हा जन्माचा पुरावा म्हणून पासपोर्टसाठी मान्य केला जात होता, परंतु तो आता बंद करण्यात आला असून त्याबाबतची अधिसूचना लवकरच जारी होणार असल्याचे वर्गीस यांनी सांगितले. गोव्यातून लोक मोठ्या प्रमाणात नोकरी, शिक्षण, व्यवसायासाठी परदेशात जातात. त्यासाठी त्यांना पासपोर्ट करावा लागतो. त्याशिवाय परदेशात जाता येत नाही. आता पासपोर्टसाठी अर्ज करताना सर्वांनाचा जन्म प्रमाणपत्राची प्रत सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे पासपोर्टकरीता अर्ज करताना जन्म प्रमाणपत्र जोडण्यात यावे, असे आवाहन पासपोर्ट कार्यालयाने केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article