For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पक्षी स्वयंवर

06:51 AM Sep 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
पक्षी स्वयंवर
Advertisement

रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी ऐकताना सगळ्यात गंमत वाटते ती त्यामधल्या स्वयंवरांची. पूर्वीच्या काळी स्त्रियांना केवढा मान होता. किंवा त्यांच्या मतांना विचारात घेऊन मगच लग्न ठरत होते. हे सगळं वाचताना आजच्या युगामध्ये आश्चर्य वाटते. कारण काही काळानंतर हा प्रघात बदलला आणि पुरुषांचं वर्चस्व आलं. माणसाचं असं असेल तर प्राणी, पक्षी, किटक यांची लग्नं कशी होत असतील? त्यांचे संसार कसे होत असतील? असा दुसराही विचार मनामध्ये आला आणि त्याचा शोध सुरू झाला. हा शोध घेताना लक्षात आलं की प्राण्यांच्या जगातसुद्धा मादीला जास्त महत्त्व असतं. जी स्त्राr-पक्षीण असते ती स्वत: ठरवते की कोणत्या नवऱ्याबरोबर आपण रहायचं, कसा संसार करायचा, पिल्लं कशी वाढवायची या सगळ्या गोष्टींचा विचार ही पक्षीण करते आणि मगच आपला सहचर निवडते.

Advertisement

ही कथा आहे गरुडाची. गरुड जरी सर्व शक्तीमान पक्षी आपण मानत असलो तरीही त्याची निवड त्याची बायको करते. तो शक्तीच्या बळावर काही करू शकत नाही. त्याला बायको निवडीचा अधिकार नाही. संसार करायचा ठरला किंवा प्रजनन करायचं ठरलं, की अनेक गरुड पक्षी मादी पक्षांच्या भोवती माणसाप्रमाणे घिरट्या घालत असतात. या पक्षांमधला जो गरुड मादीला आवडेल त्याला दुसऱ्या दिवशीपासून या पक्षीणीबरोबर फिरायला मिळते. ही पक्षीण उंच उंच आकाशात चोचीमध्ये एक काडी धरून पुढे जाते आणि अतिशय उंचावर गेल्यानंतर हा गरुड पक्षी तिच्या मागे मागे आल्यानंतर ठराविक अंतर राखून तो खालूनच उडत असतो. त्यानी तिच्यापेक्षा वर उडायचं नसतं. असा एक अलिखित नियम असतो. ही गरुड पक्षीण वरून आकाशातून ती काडी चोचीतून सोडल्यानंतर वरचेवर तो पक्षी झेलतो की नाही ही पहिली परीक्षा असते. ती झाल्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशीही या पक्षाने बरोबर फिरायची परवानगी मिळते. आता पक्षीण जरा मोठी काडी आपल्या पायामध्ये धरते आणि उंच आकाशात विहारायला लागते. वर गेल्यानंतर ही काडी पुन्हा ती अलगद सोडते. तो पक्षी आपल्या चोचीने ती काडी पकडतो. दुसऱ्या दिवशीची परीक्षा झाल्यानंतर, तिसऱ्या दिवशीही पक्षी पिल्लाच्या वजनाइतकी मोठी काडी आपल्या पायात धरून उंच उडते आणि ह्या पक्षाला पुन्हा त्या परीक्षेला सामोरे जायला लागतं. आपल्या पिल्लाला जर शत्रुनी वर नेलं आणि वरून जर सोडलं तर त्या पिल्लाला वरचेवर ह्याला झेलता येते की नाही ही ती परीक्षा असते. ही परीक्षा पास झाल्यानंतर तिला अतिशय आनंद होतो आणि ती ह्या पक्षाबरोबर नृत्य करायला लागते. दोघेही आनंदाने नृत्य करतात आणि उंच उंच उडत जाऊन एखाद्या उंच डोंगरावर ते झाडाच्या वरच्या बाजूला उंचीवरती आपलं घरटं बनवतात. यामध्ये त्यांना कोणाचीही मदत नसते आणि मग यथावकाश त्यांच्या पिल्लांना ते जन्म देतात. हा जन्म दिल्यानंतरसुद्धा पक्षी पिल्लांना जन्म देईपर्यंत व नंतर पिल्लांना भरवणं ही सगळी कामं पुरुष गरुड करत असतो आणि मगच त्या पिल्लांच संगोपन सुरू होतं. या कथा ऐकल्यानंतर आपल्याला माणसांची नकळत तुलना करायचीही परिस्थिती डोळ्यासमोर येते की लग्न ठरल्यानंतर बायकोचा शब्द वरचेवर जेवणारा नवरा आपल्याला या गरुड पक्षांमध्ये दिसतो. पिल्लं झाल्यानंतर या पिल्लांची यथावकाश जबाबदारी घेणारा एक आदर्श बापही याच पक्षांमध्ये जाणवतो. अशीच आदर्श पद्धती आजच्या युगातही रूढ होत चालली आहे. मुली आपल्याआपण ठरवतात आणि योग्य त्या मुलाशी लग्न ठरवतात.

Advertisement
Advertisement
Tags :

.