महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सिंधुदुर्गातील पक्षी भारतीय डाक विभागाच्या पोस्ट कार्डवर

12:28 PM Nov 11, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

 प्रा . डाॅ.गणेश मर्गज यांनी टिपलेल्या ''ग्रे हेडेड बुलबुल'' पक्षाच्या छायाचित्राची निवड

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

पश्चिम घाट हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. ज्यामध्ये अनेक प्रकारच्या प्रदेशानिष्ठ व दुर्मिळ प्राण्यांच्या प्रजाती सापडतात.भारतीय डाक विभागाने यावर्षी पश्चिम घाटातील प्रदेशानिष्ठ व संकटग्रस्त प्रजातीतील पक्षी आपल्या पोस्ट कार्डवर प्रकाशित केले. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलांमध्ये काढलेले ग्रे हेडेड बुलबुल ( राखी डोक्याचा बुलबुल ) हा पक्षी भारतीय डाक विभागाने राष्ट्रीय डाक सप्ताहाच्या निमित्ताने आपल्या पोस्ट कार्डवर प्रकाशित केला .या पक्षाचे छायाचित्र श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथील प्राणीशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. गणेश मर्गज यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेले होते. त्यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ शुभदादेवी भोंसले, विश्वस्त युवराज्ञी उर्वशीराजे भोंसले, युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोंसले, संस्थेचे संचालक प्रा.डी टी देसाई, सहसंचालक अॅड शामराव सावंत, सौ.अनुराधा घोरपडे, सौ .प्रिया घोरपडे, बेंगलोर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल,महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

ग्रे हेडेड बुलबुल हा पक्षी संकटग्रस्त प्रजातीतील असून हा पक्षी फक्त पश्चिम घाटात सापडतो .सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नरेंद्र डोंगर ,पांग्रड , बर्ड हाईड कुडाळ, आचरा, तळकट , तिलारी, मळगाव, बांदा या ठिकाणी सापडतो.हा पक्षी पाहण्यासाठी भारताच्या विविध भागातून पक्षी निरीक्षक व छायाचित्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत असतात.

Advertisement
Tags :
# sindhudurg# tarun bharat news# Birds of Sindhudurga on postal cards
Next Article