For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

6 वर्षांनी होणार बिपाशा बासूचे पुनरागमन

06:22 AM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
6 वर्षांनी होणार बिपाशा बासूचे पुनरागमन
Advertisement

एकेकाळी बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून बिपाशा बासूला ओळखले जात होते. परंतु चित्रपटसृष्टीपासून अंतर राखल्यामुळे बिपाशा प्रसिद्धीच्या झोतापासून गायब झाली होती. पण सुमारे 6 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बिपाशा अभिनयाच्या क्षेत्रात परतणार आहे. तिने एका दिग्दर्शकासोबत पुढील प्रोजेक्टसाठी हातमिळवणी केली आहे.

Advertisement

बिपाशा यापूर्वी 2020 मध्ये डेंजरस या सीरिजमध्ये दिसून आली होती. यानंतर  2022 मध्ये बिपाशाने मुलीला जन्म दिला होता आणि तेव्हापासून ती स्वत:च्या लाडक्या मुलीच्या पालनपोषणात व्यग्र राहिली आहे. आता अभिनयाच्या क्षेत्रात ती एका सीरिजद्वारे पुनरागमन करणार आहे.

बिपाशाने हंसल मेहता यांच्या वेबसीरिजमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या सीरिजमध्ये तिच्यासोबत विशाल जेठवा आणि सनी कौशलदेखील महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे. बिपाशाची ही वेबसीजि प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. तर मोठ्या पडद्यावर बिपाशा सुमारे 11 वर्षांपासून दिसून आलेली नाही. तिचा अखेरचा प्रदर्शित चित्रपट अलोन होता, जो 2011 मध्ये झळकला होता.

Advertisement

बिपाशाची आगामी सीरिज सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी आलोक लाल यांच्याकडून लिखित पुस्तक ‘द बाराबंकी नार्कोस : बस्टिंग इंडियाज मोस्ट नोटोरियस ड्रग कार्टेल“वर प्रेरित असणार आहे. यात 1984 च्या अमली पदार्थांच्या तसकरीशी निगडित घटनाक्रमाला दाखविले जाऊ शकते.

Advertisement
Tags :

.