For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पालिकेत बायोमेट्रीक प्रणाली धूळखात

05:12 PM Mar 05, 2025 IST | Radhika Patil
पालिकेत बायोमेट्रीक प्रणाली धूळखात
Advertisement

सातारा : 

Advertisement

कोरोना काळात स्पर्शामुळे व्हायरस मागे लागतो या भितीपोटी बहुतांशी शासकीय कार्यालयासह खाजगी कार्यालयातील हजेरी बायोमेट्रीक मशिनची बंद करण्यात आली होती. परंतु पुन्हा कोरोना गेल्यानंतर अनेक कार्यालयातील बायोमेट्रीक प्रणाली सुरु झाली. परंतु साताऱ्याच्या पालिकेतली बायोमेट्रीक प्रणाली बंद असल्याने बहुतांशी कर्मचारी हे सवडीने येतात अन् हजेरीच्या कॅटलॉगवर सहया ठोकतात. आओ जाओ आपलीच पालिका हाय अशी तऱ्हा सध्या पालिकेत पहायला मिळत आहे. स्मार्ट टेक्नॉलॉजीकडे वळलेल्या पालिकेत मात्र हजेरी जुन्याच पद्धतीने सुरु आहे.

सातारा नगरपालिकेतल्या सर्वच विभागातल्या कर्मचाऱ्यांची हजेरीची प्रणाली ही बायोमेट्रीक प्रणालीवर केली जात होती. परंतु कोरोनाच्या काळात बायोमेट्रीक मशिनमधून कोरोनाची लागण होण्याची भिती असल्याकारणाने त्यावेळी बायोमेट्रीकची हजेरी बंद करण्यात आली होती. त्यास तीन वर्षाचा काळ होवून गेला. त्यानंतर कर्मचाऱ्यांची हजेरी ही ऑफलाईन मस्टरवरच सुरु आहे. त्यामुळे बहुतांशी विभागातले कर्मचारी हे आओ जाओ आपलीच पालिका हाय, फक्त खातेप्रमुख आपल्याच मर्जीतले असले म्हणजे बस झाले. तसेच काही कर्मचारी तर चक्क एकाच दिवशी आठवड्याच्या सह्या ठोकून मोकळ्या होत असल्याचे प्रकार घडले आहेत. बायोमेट्रीक प्रणाली नसल्याने सोयीनुसार घरातली इतर कामे उरकून काही कर्मचारी हे पालिकेची पायरी चढत असतात. पालिकेत प्रवेश करण्यापूर्वी साहेबांची 365 दारात नसली तरीही ते आहेत काय हे हळूच इतर कर्मचाऱ्यांना विचारुन आपल्या केबीनच्या दिशेने मार्गस्थ होतात. केबीनमध्ये पोहचल्यानंतर मग काही कोणी बोलू शकत नाही. पालिकेत सीसीटीव्ही सगळया विभागात आहे, कोण किती वाजता आले, कोण किती वाजता गेले याचे रेकॉर्डिंग होत असले तरीही वेळेत कार्यालयात उपस्थित राहण्याची पद्धत अलिकडे मोडली गेली आहे. त्यामुळे सकाळच्या कार्यालय सुरु होण्याच्या वेळेत आणि दुपारी पालिकेत सहसा कोणी नसते.

Advertisement

  • जनरेटरला काय झाले?

दर मंगळवारी शहरातील कुठल्या ना कुठल्या भागातला विद्युतपुरवठा हा खंडीत होत असतो. पालिकेचा विद्युतपुरवठा खंडीत झाला तरीही कुठलेही काम थांबायला नको म्हणून जनरेटरची सुविधा आहे. मात्र, मंगळवारी हा जनरेटर सुरु नव्हता. त्यामुळे अनेक विभागात बॅटऱ्या लावून आपले कामकाज सुरु होते. जनरेटर सुरु नसल्याने संगणक प्रणाली बॅटरी बॅकअपवर सुरु असल्याचे दिसत होते.

Advertisement
Tags :

.