बिनी बन्सल फोन पे संचालक मंडळातून पडले बाहेर
07:00 AM Nov 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : फ्लिपकार्टचे संस्थापक बिनी बन्सल हे ‘फोन पे’ च्या संचालक मंडळातून बाहेर पडले आहेत. फ्लिपकार्टचे संस्थापक बिनी बन्सल हे ‘फोन पे’ च्या संचालक मंडळांमधून बाहेर पडले आहेत. अलीकडेच बन्सल यांनी ई कॉमर्स सेवा क्षेत्रातील प्लॅटफॉर्म ऑपडोअरची सुरुवात केली आहे. यावर्षी जानेवारीमध्ये फ्लिपकार्ट मंडळाचा त्यांनी राजीनामा दिला होता. फ्लिपकार्टच्या फोन पे अधिग्रहणासाठी बिनी बन्सल यांनी त्यावेळी आपल्या कार्यकाळात मोठी भूमिका बजावली होती. ‘फोन पे’ चे संस्थापक समीर निगम यांच्यासोबत त्यांनी संस्थेच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. फोन पे मध्ये बन्सल यांची 1 टक्का इतकी हिस्सेदारी आहे.
Advertisement
Advertisement