अमेरिकेत तयार होणार ‘बिंग बेंड’
बुर्ज खलीफापेक्षा 1 हजार फूट अधिक उंच
जगातील सर्वात उंच इमारत असण्याचा विक्रम आगामी काळात दुबईच्या बुर्ज खलीफाऐवजी अमेरिकेत निर्माण होणाऱ्या बिग बेंडच्या नावावर नेंदविला जाऊ शकतो. मॅनहॅटन येथे प्रस्तावित बिग बेंड ही जगातील सर्वात उंच इमारत होण्यासाठी सज्ज आहे. ही इमारत उलट्या यू आकारात तयार होणार असून जी 4 हजार फुटांपर्यंत फैलावलेली असेल. या प्रकल्पाचे हे डिझाइन कठोर प्लॅनिंग लॉपासून वाचण्यासोबत खर्च घटविण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे.
अमेरिकेत गगनचुंबी इमारतींसाठी तुलनेत अधिक खर्च येतो, याचमुळे वळणदार आकार एक बचावाचा मार्ग देतो. रियल इस्टेट डेव्हलपर्स या कायद्याचा लाभ घेत आहेत, यामुळे त्यांना शेजारी इमारतींकडून हवाई अधिकार खरेदी करण्याची अनुमती मिळते. स्वत:च्या वळणदार डिझाइनसोबत बिग बेंड उंचीसाठी अतिरिक्त खर्च न करता अधिक हवाईक्षेत्रावर कब्जा करू शकते. हा आकार डेव्हलपर्सला छोट्या भूखंडांवर उंच इमारत निर्माण करण्यास सक्षम करतो, यामुळे त्यांचा एकूण खर्च कमी होतो.
बुर्ज खलीफापेक्षा अधिक उंच
मॅनहॅटनमध्ये हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण झाल्यास बिग बेंड दुबईतील बुर्ज खलीफापेक्षा 1 हजार फूट अधिक उंच इमारत असेल. अशास्थितीत वर्तमानात जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलीफा यामुळे मागे राहणार आहे. ही नवी इमारत वन वर्ल्ड ट्रेड सेंटरपेक्षा (न्यूयॉर्कमध्ये फ्रीडम टॉवर) अधिक उंच असणार आहे. या इमारतीच्या डिझाइनमध्म्ये दोन्ही बाजूला खिडक्या आणि लिफ्ट्ससाठी एक ग्रिड आहे.