For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चीनच्या ‘लिटिल व्हेनिस’वर अब्जावधी खर्च

06:41 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
चीनच्या ‘लिटिल व्हेनिस’वर अब्जावधी खर्च
Advertisement

चीनने स्वत:च्या देशात जगातील काही विशेष पर्यटनस्थळांची नक्कल करत स्वत:च्या येथील पर्यटन वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. याचमुळे चीनमध्ये 53 अब्ज 82 कोटी 73 लाख रुपयांचे ‘नकली’ लिटिल व्हेनिस’ विदेशी पर्यटकांकरता निर्माण करण्यात आले होते. परंतु आता हे ठिकाण पर्यटकांशिवाय सुने पडले आहे. चीनच्या व्हेनिस नावाचा हा प्रकल्प पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे, कारण याचे बहुतांश हिस्से निर्जन आणि निर्जीव वाटतात.

Advertisement

चीनच्या उत्तर-पूर्व लियाओनिंग प्रांतातील बंदर शहर डालियान नजीक छोटेसे व्हेनिस तयार करण्याचा उद्देश युरोपील शैलीची वास्तुकला आणि संस्कृतीला सामील करणे होते. येथे चिनी नागरिकांना इटलीचा आनंद घेण्यासाठी विदेश प्रवास करावा लागू नये असाही उद्देश होता. परंतु याच्या निर्मितीला 4 वर्षे लागली आणि अपेक्षेच्या तुलनेत गर्दी आकर्षित करणे आणि प्रदूषण कमी करण्यास सक्षम होण्याऐवजी ‘तरंगते शहर’ एक निर्जीव आणि निर्जन ठिकाण ठरले आहे.

येथे अर्धवट इमारती आणि विरळ रस्त्यांच्या माध्यमातून पूर्व-आशियाई देशाच्या व्हेनिसच्या प्रयत्नाचे नवे फुटेज पाहता हे पर्यटकांसाठी आकर्षक स्थळ नसल्याचे स्पष्ट होते.  लिटिल व्हेनिस येथे पोहोचल्यावर हैराण झाल्याचे एका ट्रॅव्हल ब्लॉगरने म्हटले आहे. डालियानमध्ये असामान्य स्थळं असूनही येथील नवेपणा लवकर फिका पडतो, हे प्रत्यक्षात मृत ठिकाण आहे, येथे सर्वकाही बंद असल्याचे ब्लॉगरचे सांगणे आहे.

Advertisement

डालियानमध्ये सर्वत्र इमारती आढळून येतील, परंतु त्यांचा कुठलाच वापर होत नाही. डालियानमधील लिटिल व्हेनिस 2015 मध्ये जनतेसाठी खुले करण्यात आले होते. याणित 4 किलोमीटर लांबीचा मानवनिर्मित कालवा आहे. विकासकांना मोठा वाहतूक प्रवाह असल्याने वायू प्रदूषण कमी करण्याची अपेक्षा होती, परंतु हा कालवा अनेक ठिकाणी कोरडा पडला आहे.

Advertisement
Tags :

.