For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अब्जाधीशाचा एआयद्वारे स्री अवतार

06:52 AM Jun 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
अब्जाधीशाचा एआयद्वारे स्री  अवतार
Advertisement

अब्जाधीशाचे विचित्र कृत्य : एलन मस्कला मागे टाकणार असल्याचा दावा

Advertisement

चीनमधील स्मार्ट डिव्हाइस कंपनी ड्रीमे टेक्नॉलॉजीचे संस्थापक आणि सीईओ यू हाओ, ड्रीमे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याची कंपनी खासकरून रोबोट व्हॅक्यूम क्लीनर आणि स्मार्ट घरगुती उपकरणांच्या निर्मितीसाठी ओळखली जाते. 39 वर्षीय यू हाओ हा चीनच्या जियांग्सू प्रांताचा रहिवासी असून त्याने 2017मध्ये कंपनी सुरू केली होती आणि काही वर्षांमध्येच त्याची कंपनी चीनच्या सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये सामील झाली आहे. यू हाओची मालमत्ता सध्या 60 हजार कोटीची आहे. यू हाओने सोशल मीडियावर स्वत:ची एआय जनरेटेड छायाचित्रे शेअर केली आहेत. यात तो महिलांचे कपडे आणि पारंपरिक चिनी ड्रेसमध्ये दिसून आला. काही छायाचित्रे आणि व्हिडिओंमध्ये त्याने मेकअप केला होता आणि डान्स करतानाही दिसून आला. या पोस्ट्ससोबत सौंदर्य हेच आहे असे लिहिले आहे.

एलन मस्कला आव्हान

Advertisement

यू हाओने स्वत:ला एलन मस्कचा प्रतिस्पर्धी ठरविले आहे. पुढील 5 वर्षांमध्ये मी जगातील सर्वात धनाढ्या व्यक्ती ठरेन. तसेच माझी कंपनी भविष्यात अॅपलला मागे टात लाखो उपग्रह प्रक्षेपित करणार असल्याचा दावा यू याने केला आहे.

कर्मचाऱ्यांना केले इन्फ्लुएंसर

यू हाओने स्वत:च्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सोशल मीडियावर सक्रीय राहण्याचा निर्देश दिला आहे. कंपनीची उत्पादने आणि तंत्रज्ञानाशी निगडित पोस्ट शेअर करण्याची सूचना त्याने केली आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या अकौंटवर 10 हजार फॉलोअर्स असतील, त्यांना 10 हजार युआनचे इनाम देण्यात येईल अशी घोषणा त्याने केल्यावर अनेक कर्मचारी सातत्याने सोशल मीडिया पोस्ट करू लागले.

Advertisement
Tags :

.