बिलियर्ड्सपटू मनोज कोठारी कालवश
06:03 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था / कोलकाता
Advertisement
भारताचे माजी विश्व बिलीयर्ड्स चॅम्पियन मनोज कोठारी यांचे हृदयविकाराने वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले. तामिळनाडूतील तिरुनेलवेली येथे एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि बिलीयर्ड्सपटू सौरभ कोठारी हा मुलगा आहे.
मनोज कोठारी यांचे वास्तव्य कोलकातामध्ये होते. 10 दिवसांपूर्वी तिरुनेलवेलीतील कावेरी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान सोमवारी सकाळी त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. मनोज कोठारी यांनी 1990 साली विश्व बिलियर्डस्चे विजेतेपद मिळविले होते. मनोज कोठारी यांचा मुलगा सौरभने 2025 साली विश्व बिलियर्ड्सचे विजेतेपद मिळविले आहे.
Advertisement
Advertisement