For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘वंदे मातरम’ संबंधित विधेयक राज्यसभेत संमत

06:09 AM Jul 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘वंदे मातरम’ संबंधित विधेयक राज्यसभेत संमत
Advertisement

राष्ट्रगीताचा अवमान केल्यास आता तीन वर्षांपर्यंत शिक्षा

Advertisement

वृत्तसंस्था

नवी दिल्ली

Advertisement

पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभेत बुधवारी ‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक (सुधारणा) विधेयक-2026’ मंजूर करण्यात आले. आता ‘जन गण मन’प्रमाणेच ‘वंदे मातरम’लाही कायदेशीर संरक्षण मिळेल. ‘वंदे मातरम’चा अपमान करणे, अनादर करणे किंवा ते गाण्यात अडथळा आणणे हे प्रकार शिक्षेस पात्र ठरणार आहेत. नवीन कायद्यानुसार राष्ट्रगीताचा अपमान केल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे.

राज्यसभेने संमती दिलेल्या सुधारणा विधेयकानुसार, राष्ट्रगीताचा हेतुपुरस्सर अपमान करणे किंवा ते गाण्यास अडथळा आणणे हा आता फौजदारी गुन्हा मानला जाईल. विरोधी पक्षांच्या विरोधानंतर आणि गदारोळात हे विधेयक मंजूर करण्यात आले. राष्ट्रीय सन्मानाशी संबंधित प्रतीकांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे सरकारचे म्हणणे आहे.

ही दुरुस्ती ‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, 1971’ ची व्याप्ती वाढवते. आतापर्यंत, हा कायदा केवळ राष्ट्रध्वज, संविधान आणि राष्ट्रगीत ‘जन गण मन’ यांनाच कायदेशीर संरक्षण देत होता. आता, ‘वंदे मातरम’ या राष्ट्रगीताचा यात समावेश करण्यात आला आहे. ‘वंदे मातरम’च्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असतानाच हे विधेयक मंजूर झाले आहे.

नवीन कायद्यात कोणत्या तरतुदी?

या सुधारणा विधेयकाचा उद्देश राष्ट्रगीताला कायदेशीर संरक्षण देणे आहे. अशाप्रकारचे संरक्षण यापूर्वी राष्ट्रध्वज, संविधान आणि राष्ट्रगीत यांना आधीपासूनच प्राप्त आहे. आता या कायद्यानुसार, राष्ट्रीय सन्मानाला कमीपणा आणणारे कोणतेही कृत्य कायद्याच्या कक्षेत येईल. या विधेयकात राष्ट्रीय चिन्हांचा अपमान करणाऱ्या गुह्यांसाठी कमाल तीन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे.

Advertisement
Tags :

.