For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराणवरील हल्ले रोखणारे विधेयक एका मताने नामंजूर

06:09 AM Aug 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
इराणवरील हल्ले रोखणारे विधेयक एका मताने नामंजूर
Advertisement

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना आता लष्करी कारवाई करण्याचा अधिकार

Advertisement

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन

Advertisement

इराणविरुद्ध लष्करी कारवाई रोखण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या सिनेटमध्ये एका मताने नामंजूर झाला. गुरुवारी झालेल्या मतदानात 49 मते बाजूने आणि 50 मते विरोधात पडली. ट्रम्प पक्षाचे खासदार डेव्ह मॅककॉर्मिक यांनी मतदानात भाग घेतला नाही. जर हा प्रस्ताव मंजूर झाला असता तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणवर हल्ला करण्यापूर्वी संसदेची मंजुरी घेणे आवश्यक ठरले असते. याचा अर्थ राष्ट्राध्यक्ष हा निर्णय स्वत:हून घेऊ शकले नसते.

इराण युद्धासंदर्भात कोणत्याही लष्करी कारवाईवर संसदेचा अंतिम निर्णय असावा, अशी मागणी विरोधी पक्षाचे खासदार करत आहेत. यासंबंधीच्या अलीकडील घडामोडींनंतर आता हे विधेयक सिनेटमध्ये मांडण्यासाठी दुसरा प्रयत्न करावा लागेल. लष्करी कारवाई रोखणारे विधेयक सध्या अमेरिकेच्या सिनेटच्या परराष्ट्र व्यवहार समितीकडे आहे.

अमेरिकेला पुन्हा इराणचा इशारा

इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी केशम बेटावरील निवासी भागांवर अमेरिकेने केलेल्या कथित हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. याला दहशतवादी हल्ला संबोधत त्यांनी अमेरिका निष्पाप लोकांचे रक्त सांडत आहे आणि त्याला त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला आहे. अमेरिका दररोज नवनवीन गुन्हे करत आहे. रणांगणावरील पराभवाचा बदला घेण्यासाठी ते नागरिकांना लक्ष्य करत असल्याचेही ते पुढे म्हणाले. यापूर्वी, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने इराणमधील अनेक आयआरजीसी लष्करी तळ, क्षेपणास्त्र आणि ड्रोन तळ आणि किनारी संरक्षण केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले केल्याचा दावा केला होता.

Advertisement
Tags :

.