For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-सौदीच्या विदेश मंत्र्यांदरम्यान द्विपक्षीय बैठक

06:50 AM Nov 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारत सौदीच्या विदेश मंत्र्यांदरम्यान द्विपक्षीय बैठक
Advertisement

रणनीतिक भागीदारी मजबूत करण्यासंबंधी चर्चा : सौदीचे विदेशमंत्री भारताच्या दौऱ्यावर

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी दिल्लीत सौदी अरेबियाचे विदेशमंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान अल सौद यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली आहे. या बैठकीत दोन्ही देशांदरम्यान रणनीतिक भागीदारी मजबूत करणे आणि भष्यात सहकार्यासाठी नवे मार्ग शोधण्यावर चर्चा झाली आहे.

Advertisement

आमची भागीदारी प्रगतिपथावर असून याचा भर भविष्यावर आहे. दोन्ही देशांच्या रणनीतिक भागीदारी परिषदेच्या अंतर्गत राजनयिक, सुरक्षा, सामाजिक आणि सांस्कृतिक सहकार्यावर आधारित समितीची दुसरी बैठक आयोजित करत असल्याने मी आनंदी आहे. आमचे उच्चस्तरीय संपर्क आणि बहुपक्षीय व्यासपीठांवर समन्वयाची गति अत्यंत चांगली राहिली आहे. सौदी अरेबियात सुमारे 26 लाख भारतीय असून त्यांचे कल्याण सौदी अरेबियाचे सरकार सुनिश्चित करत  असल्याचे उद्गार जयशंकर यांनी बैठकीला संबोधित करताना काढले आहेत.

नवी भागीदारी निर्माण करण्याची संधी

प्रशिक्षण क्षमता निर्मितीव आम्ही सातत्याने विचारविनिमय करत आहोत आणि आता आमचे सहकार्य संरक्षण उद्योग आणि निर्यातीपर्यंत वाढले आहे. याचबरोबर सुरक्षा सहकार्यात रणनीतिक वाढ दिसून येत आहे. दहशतवाद, कट्टरवाद, दहशतवाद आणि अमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात आम्ही मिळून काम करत आहोत. सौदी अरेबियाचे ‘व्हिजन 2030’ आणि भारताच्या ‘विकसित भारत 2047’ दोन्हींसाठी आमचे उद्योग नवी भागीदारी निर्माण करण्याची संधी प्रदान करत असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.

भारत-सौदी संबंध वृद्धींगत

भारत-सौदी अरेबिया संबंध वृद्धींगत करणे आणि सहकार्याचे नवे मार्ग शोधण्यात येत आहेत. भारतासोबत आमचे संबंध दीर्घकालीन सहकार्य आणि परस्पर सन्मानावर आधारित आहेत. शतकांपासून व्यापार आणि सांस्कृतिक आदान-प्रदानाच्या संयुक्त इतिहासाने आमच्या मजबूत आणि स्थिर संबंधांचा पाया रचला आहे. आम्ही क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकरणांमधील आमच्या सहकार्याला अत्यंत महत्त्व देतो असे उद्गार सौदीचे विदेश मंत्री सौद यांनी काढले आहेत.

व्यापार अन् गुंतवणुकीत सहकार्य

दोन्ही देशांमधील व्यापार अन् गुंतवणुकीतील सहकार्य वाढत आहे. व्यापार आणि गुंतवणूक हे आमच्या भागीदारीचे महत्त्वपूर्ण स्तंभ आहेत. तंत्रज्ञान, ऊर्जा, नुतनीकरणीय ऊर्ज, संपर्कव्यवस्था, आरोग्य आणि शिक्षण यासारख्या नव्या क्षेत्रांमधील सहकार्य वाढविण्यात येत आहे. संस्कृती, पर्यटन आणि युवांना प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो. प्रसारमाध्यम आणि मनोरंजनाच्या  क्षेत्रातही सहकार्याच्या मोठ्या संधी असल्याचे जयशंकर म्हणाले.

पश्चिम आशियाची स्थिती चिंतेचा विषय

सौदी अरेबियाची पश्चिम आशियात स्थिरता निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका असल्याचे आमचे मानणे आहे. पश्चिम आशियातील स्थिती विशेषकरून गाझामध्ये सुरू असलेला संघर्ष चिंतेचा विषय आहे. भारत याप्रकरणी स्वत:च्या भूमिकेवर ठाम आहे. आम्ही दहशतवाद आणि ओलीस ठेवण्याच्या घटनांची निंदा करतो आणि निर्दोष नागरिकांच्या मृत्युमुखी आम्ही दु:खी आहोत. भारत नेहमीच पॅलेस्टाइनच्या मुद्द्यावर द्विराष्ट्र तोडग्याचा समर्थक राहिला असल्याचे जयशंकर यांनी स्पष्ट पेले.

Advertisement
Tags :

.