चैनीसाठी दुचाकी चोरणाऱ्यास अटक
कोल्हापूर :
कारागृहातून बाहेर पडल्यानंतर चैनीसाठी दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईत दुचाकी चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून पोलिसांनी 7 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. अमित चंद्रकांत हात्तिकोटो (वय 34 रा. सानेगुरुजी वसाहत) असे त्याचे नांव आहे. जुनाराजवाडा, शाहूपुरी, आणि गोकुळ शिरगांव येथील दुचाकी चोरीचे गुन्हे त्याच्याकडून उघडकीस आले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सराईत दुचाकी चोरटा अमित हात्तीकोटे याने कारागृहातून बाहेर पडल्यानंतर विविध ठिकाणाहून दुचाकींची चोरी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळाली होती. यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मैलखड्डा येथे सापळा रचून अमित हत्तीकोटे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने जुना राजवाडा, शाहूपुरी येथील दोन, आणि गोकुळ शिरगांव येथील दोन तसेच अन्य दोन दुचाकी जप्त केल्या.
पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार वैभव पाटील, प्रदीप पाटील, विशाल खराडे, संतोष बरगे, परशुराम गुजरे यांनी ही कारवाई केली.
- कारागृहातून बाहेर पडला....
अमित हात्तीकोटे हा सराईत दुचाकी चोरटा आहे. तो दारुचा व्यसनी असून, चैनीसाठी त्याने दुचाकी चोरल्याचे समोर आले आहे. गेल्या आठ महिन्यांमध्ये त्याला पोलिसांनी दोन वेळा अटक केली आहे. आता पुन्हा तीसऱ्यांदा अटक केली.