For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेंगुर्लेत भर दिवसा सागरतीर्थ किनाऱ्यावरून दुचाकीची चोरी

01:23 PM Sep 05, 2024 IST | अनुजा कुडतरकर
वेंगुर्लेत भर दिवसा सागरतीर्थ किनाऱ्यावरून दुचाकीची चोरी
Advertisement

चोरटा सीसीटीव्हीत कैद ; पोलीसांत दुचाकी चोरीचा अज्ञातावर गुन्हा दाखल

Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-
शिरोडा-सागरतीर्थ किनाऱ्यावर ठेवलेली दुचाकी भर दिवसा चोरून नेण्याची घटना बुधवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत दुचाकीचे मालक केशव दिगंबर फटनाईक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वेंगुर्ले पोलीसांत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सागरतीर्थ-टेंबवाडी भागात रहाणारे केशव दिगंबर फटनाईक हे मच्छिमारीस जाण्यासाठी आपल्या एप्रिला एस आर १२५ गाडी क्रमांक एम.एच.-०७-ओ.के.- ०४०४ या दुचाकीने किनारी सकाळी ६.४५ वाजता गेले होते. ती गाडी चावी काढून घेत नेहमीप्रमाणे किनारी ठेवून मच्छिमारीसाठी गेले. समुद्रात मासेमारी करून सकाळी १०.३० वाजता ते आले. त्यांनी ठेवलेल्या जागेबर आपली दुचाकी दिसली नाही. त्यामुळे घरी जाऊन चौकशी केली मात्र घराकडूनही कुणी ती नेलेली नव्हती. त्या परीसरांत तसेच गावांत त्या दुचाकीची चौकशीही केली पण ती न आढळल्याने केशव फटनाईक शिरोडा पोलीसांत आपली दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर भारतीय दंड संहिता ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, सदरची टुव्हीलर तरूण युवक चोरट्याने चोरून नेत असल्याचे सी.सी.टी.व्ही.फुटेज मध्ये दिसत आहे. तसेच बाटेतील सी.सी.टी.व्ही.फुटेज मध्ये आपला चेहरा दिसून नये यासाठी चेहऱ्यावर हात तसेच कांही ठिकाणी टीशर्ट चेहऱ्यावर ओढण्याचा प्रयत्न करीत दुचाकी चोरून नेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तो चोरटा युवक हा त्याभागातील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे यांचा ज्ञान असलेला आणि त्याचा भागाची माहिती असलेला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोडा बीट ठाणे अंमलदार गजेंद्र भिसे व हे कॉन्स्टेबल अजय राऊळ हे करीत आहे. या दुचारीची माहिती मिळाल्यास मोबा. नं. ९६८९७८५०९९ या क्रमांकाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीसांतर्फे करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.