For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

11:09 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
Advertisement

वार्ताहर /उचगाव

Advertisement

बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील सुळगा (हिं.) गावाजवळील पेट्रोलपंपनजीक राऊत हॉटेल, जिम शेजारी मंगळवारी दुपारी दोनच्या सुमाराला एका ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला समोरून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाला आहे. तो सध्या कोमात असल्याचे समजते. सदर युवकाला तातडीने केएलई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी युवकाचे नाव रोहित कृष्णा शहापूरकर (वय 28) राहणार कल्लेहोळ असे आहे. रोहित कृष्णा शहापूरकर हा बेळगावहून आपल्या दुचाकीवरून (केए 22 ईएक्स 4536) कल्लेहोळकडे निघाला होता. तर बेळगावच्या दिशेने ट्रक (केए 22 बी 9626) भरधाव चालला होता. दुपारी दोनची वेळ असल्याने मळेकरणी देवीच्या आमराईकडे जाणाऱ्या भाविकांचीही मोठी गर्दी या रस्त्यावर होती. याच गर्दीतून वाट काढताना ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सदर तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोकीला जबर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे. तातडीने या युवकाला केएलई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जखमी युवकाबाबत हळहळ

Advertisement

सदर शहापूरकर कुटुंब हे अतिशय गरीब आहे. वडिलांना अर्धांगवायू झाल्याने ते घरी झोपून असतात. आई हयात नाही, एक बहीण असून तिचेही लग्न झाले आहे. रोहित शहापूरकर हा एका पेट्रोलपंपवर काम करून आपला उदरनिर्वाह चालवत आहे. या युवकाच्या अपघातामुळे कल्लेहोळ गावातून व परिसरातील नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.