For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केदनूरजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार

12:05 PM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
केदनूरजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार
Advertisement

काकती पोलीस स्थानकात एफआयआर

Advertisement

बेळगाव : केदनूर-बंबरगा रोडवर टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 12 च्या सुमाराला घडली आहे. मारुती सुबाण्णा पाटील (वय 40, रा. राजगोळी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) असे त्या दुर्दैवी दुचाकीस्वाराचे नाव आहे. मारुती हा केदनूर येथील नातेवाईकांच्या घरी जावून बेळगावकडे दुचाकी क्रमांक एमएच 09 डीजी 6166 वरून जात होता. यावेळी समोरुन येणाऱ्या टिप्पर क्रमांक जीए 09 यु 6999 ने धडक दिली. यामध्ये मारुती यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. मारुती यांच्या पत्नीची सोमवारी प्रसूती झाली. त्यांना मुलगाही झाला आहे. मंगळवारी ते हॉस्पिटलकडेच जात असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. काकती पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मारुती यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.