For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बसवेश्वर जयंतीनिमित्त उद्या बाईक रॅली

10:19 AM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
बसवेश्वर जयंतीनिमित्त उद्या बाईक रॅली
Advertisement

बेळगाव : अखिल भारत वीरशैव लिंगायत महासभा जिल्हा शाखा बेळगाव आणि श्री जगद्ज्योती बसवेश्वर जयंती उत्सव केंद्र समिती यांच्यावतीने श्री जगद्ज्योती बसवेश्वर जयंतीनिमित्त रविवार दि. 5 रोजी भव्य बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे. शिवबसवनगर येथील लिंगायत भवनपासून या बाईक रॅलीला प्रारंभ होणार आहे. कारंजी मठाचे श्री गुरुसिद्ध महास्वामीजी यांच्या हस्ते बाईक रॅलीला सुरुवात होणार आहे, अशी माहिती अध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद यांनी पत्रकार परिषदेत दिली. बाईक रॅलीला लिंगायत भवनपासून प्रारंभ होऊन नागनूर मठ, रामदेव हॉटेल, चन्नम्मा सर्कल, गणपत गल्ली, बसवेश्वर सर्कल मार्गे गोवावेस येथे सांगता होणार आहे. त्याबरोबर बुधवार दि. 8 ते शुक्रवार दि. 10 मे दरम्यान श्री जगद्ज्योती बसवेश्वर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. 8 रोजी कारंजी मठाचे गुरुसिद्ध महास्वामीजी यांच्या सानिध्यात कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे. गुरुवार दि. 9 रोजी नृत्य स्पर्धा व इतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तर शुक्रवार दि. 10 रोजी भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. दुपारी 4 वाजता राणी चन्नम्मा चौकातून या मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. यावेळी गुरुदेव पाटील, भालचंद्र बागी, प्रसाद हिरेमठ, वीणा नागमोती, सुजित मुळगुंद उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.